एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : मी कोणावरही टीका करत नाही, आमच्याकडे नीती, नियती आहे अन् निधी देखील आहे; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य; राज्याच्या तिजोरीबाबत पुनर्उच्चार?

Devendra Fadnavis : राज्यातील नगरपरिषद निवडणूक रणसंग्रामातील मुख्यमंत्र्यांची आजची पहिली सभा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात पार पडली.

Devendra Fadnavis चंद्रपूर : राज्यातील नगरपरिषद निवडणूक रणसंग्रामातील मुख्यमंत्र्यांची आजची पहिली सभा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात पार पडली. भद्रावती शहरात विकासाच्या योजना राबविण्यासाठी भाजपला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलंय. आपण प्रचार सभेत विरोधकांवर टीका करत नाही. आम्ही सकारात्मक विचार घेऊन आलोय. आम्ही एक विकास आराखडा घेऊन जनतेपुढे जात आहोत असे सांगत आपल्याकडे नीती, नियत आणि निधी असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीसांनी सुचकपणे भाष्य केलं आहे.

Devendra Fadnavis in Bhadravati : सर्वधर्म आणि संस्कृतींचा भद्रावती येथे संगम आहे

लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी यावेळी भाषणाला सुरुवात केली. सर्वधर्म आणि संस्कृतींचा भद्रावती येथे संगम आहे. या मतदारसंघात सरकारने मोठा पैसा दिलाय. मी कोणावरही टीका करत नाही, आम्ही विकासाचा मॉडेल घेऊन आलोय, आमच्याकडे नीती आहे, नियती आहे आणि निधी देखील आहे. छोट्या शहरांमध्ये जर आपण निधी दिला तर आपण या शहरांचा चेहरा बदलू शकतो. शहरामध्ये संधी असल्यामुळे गावातले लोक शहराकडे जातात. पण नियोजन नसल्यामुळे शहरांची अवस्था बिकट झाली. मोदीजींनी पहिल्यांदा देशातल्या शहरांसाठी विविध योजना सुरू केला, त्या योजनांच्या माध्यमातून लाखो कोटी रुपये शहरांच्या विकासासाठी मोदीजींनी दिले. शहरातील घरांचे पट्टे आम्ही देणार आहोत, म्हणजे त्यांचा विकास करता येईल.

Devendra Fadnavis : दोन तारखेला कमळाची काळजी घ्या, त्यानंतरचे पाच वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ

भद्रावती शहराला पाण्यासाठी आम्ही स्वयंपूर्ण करू. निप्पॉन डेनरोच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न आम्ही सोडवू, अधिवेशन काळात त्यावर निर्णय घेऊ.आम्ही जे बोलतो ते करतो. विजय झाल्यावर काही लोकांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना बंद होईल. पण मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत तुमचा देवा भाऊ आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना लाडक्या बहिणींना दिला आहे. 2400 आजारांना पाच लाखांपर्यंत मदत देणार आहो आणि 9 असे आजार आहे ज्यांच्या उपचारासाठी 35 लाखापर्यंत मदत दिली जाईल. दोन तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या, त्यानंतरचे पाच वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 Chandrapur : एकनाथ शिंदेंची ज्या मैदानावर तोफ धडाडली, त्याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा

नगर परिषदेवर 25 वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकतो आहे. यंदाच्या निवडणुकीत सर्व प्रमुख पक्षांचे नगराध्यक्षपद उमेदवार आजी-माजी शिवसैनिक आहेत. विशेष म्हणजे अगदी 4 दिवसांपूर्वी याच मैदानावर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचीही सभा झाली होती. त्यामुळे दोन मित्रपक्षांमध्ये होणाऱ्या इथल्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Prithviraj Chavan : कराड दक्षिण मतदारसंघात 58 हजार दुबार नावं, निवडणुकीपूर्वी नावं काढली असती तर कदाचित निकाल वेगळा असता: पृथ्वीराज चव्हाण
कराड दक्षिण मतदारसंघात 58 हजार दुबार नावं, निवडणुकीपूर्वी लेखी निवेदन दिलेलं पण... : पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
Embed widget