एक्स्प्लोर

SRH vs PBKS, Match Highlights : पंजाब किंग्ससाठी शेवट गोड, हैदराबादवर 5 गडी राखून विजय

IPL 2022 : सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यात वानखेडे मैदानात पार पडलेल्या सामन्यात पंजाबने 5 विकेट्सने विजय मिळवला आहे.

SRH vs PBKS : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील शेवटचा लीग सामन्यात पंजाब किंग्सने सनरायजर्स हैदराबादला (PBKS vs SRH) 5 विकेट्सने मात दिली आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानात पार पडलेल्या या सामन्यात पंजाबच्या लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) याने दमदार खेळी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. सामन्यात सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर त्यांनी 157 धावा करत 158 धावांचे टार्गेट पंजाबला दिले. जे पंजाबने 5 गडी गमावत 15.1 षटकात पूर्ण केले आणि विजयश्री मिळवला.

सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकत हैदराबादने फलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना सायंकाळी असून देखील हैदराबादने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना दवाची अडचण येण्याची शक्यता असतानाही हैदराबादने हा निर्णय घेतला यामागील कारण एक मोठी धावसंख्या उभी करुन पंजाबवर दबाव आणणं हे असू शकतं. पण पंजाबच्या तुफान गोलंदाजीमुळे हे हैदराबादला करता आलं नाही. त्यांच्याकडून फलंदाजांनी अतिशय सुमार फलंदाजी केल्यामुळे संघा 20 षटकात 8 विकेट्सच्या बदल्यात 157 धावाच करु शकला. ज्यामुळे आता विजयासाठी पंजाबला 158 धावांची गरज आहे.  यावेळी हैदराबादकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक 43 धावा केल्या. पंजाबच्या साऱ्याच गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी केली. यावेळी नॅथन अॅलीस आणि हरप्रीत ब्रार यांनी सर्वाधिक प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. यावेळी हरप्रीतने सर्वोत्तम गोलंदाजी करत 4 ओव्हरमध्ये 26 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तर नॅथननने 4 ओव्हरमध्ये 41 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यावेळी कागिसो रबाडा याने देखील एक विकेट घेतली.

लियामची तुफान खेळी

हैदराबादने दिलेल्या 158 धावांचा पाठलाग करताना पंजाब संघाने सुरुवातीपासून दमदार खेळी केली. बेअरस्टो आणि धवनने चांगली भागिदारी केली. 23 धावा करुन बेअरस्टो बाद झाला. शिखर मात्र टिकून होता. शाहरुखने आणि जितेश यांनी प्रत्येकी 19 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. दरम्यान लियाम याने मात्र अत्यंत तुफान खेळी केली. त्याने 22 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या. यावेळी 2 चौकार आणि 5 षटकार त्याने ठोकले. ज्यामुळे पंजाबने 15.1 षटकातचं आव्हान पार करत स्पर्धेचा शेवट गोड केला. 

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Bacchu Kadu On Eknath Shinde: देवाभाऊंचं प्रमोशन आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री..., जितके डावलतील, तितके मनात शिरतील, बच्चू कडूंचं स्फोटक भाष्य
देवाभाऊंचं प्रमोशन आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री..., जितके डावलतील, तितके मनात शिरतील, बच्चू कडूंचं स्फोटक भाष्य
Gold Rate : गुड न्यूज सोने चांदीचे दर गडगडले, सोने 2000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6000 रुपयांनी घसरले, नवे दर एका क्लिकवर
गुड न्यूज सोने चांदीचे दर गडगडले, सोने 2000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6000 रुपयांनी घसरले 
Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम
राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम; आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी
Iran Israel War : एअरस्पेस बंद, सर्वत्र सायरनचे आवाज, इराण आणि इस्त्रायलकडून रात्रभर क्षेपणास्त्रांचा मारा,क्रूड ऑईलचे दर भडकले, जागतिक मार्केट क्रॅश
इराण आणि इस्त्रायलकडून रात्रभर क्षेपणास्त्रांचा मारा,क्रूड ऑईलचे दर भडकले, आशियातील बाजार गडगडले

व्हिडीओ

Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bacchu Kadu On Eknath Shinde: देवाभाऊंचं प्रमोशन आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री..., जितके डावलतील, तितके मनात शिरतील, बच्चू कडूंचं स्फोटक भाष्य
देवाभाऊंचं प्रमोशन आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री..., जितके डावलतील, तितके मनात शिरतील, बच्चू कडूंचं स्फोटक भाष्य
Gold Rate : गुड न्यूज सोने चांदीचे दर गडगडले, सोने 2000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6000 रुपयांनी घसरले, नवे दर एका क्लिकवर
गुड न्यूज सोने चांदीचे दर गडगडले, सोने 2000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6000 रुपयांनी घसरले 
Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम
राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम; आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी
Iran Israel War : एअरस्पेस बंद, सर्वत्र सायरनचे आवाज, इराण आणि इस्त्रायलकडून रात्रभर क्षेपणास्त्रांचा मारा,क्रूड ऑईलचे दर भडकले, जागतिक मार्केट क्रॅश
इराण आणि इस्त्रायलकडून रात्रभर क्षेपणास्त्रांचा मारा,क्रूड ऑईलचे दर भडकले, आशियातील बाजार गडगडले
Chhagan Bhujbal on Rajya Sabha Election 2026: 'इतरांना जो न्याय मिळाला तो मलाही मिळायला पाहिजे होता'; नाराजीबाबत विचारताच छगन भुजबळांचं सूचक उत्तर, म्हणाले...
'इतरांना जो न्याय मिळाला तो मलाही मिळायला पाहिजे होता'; नाराजीबाबत विचारताच छगन भुजबळांचं सूचक उत्तर, म्हणाले...
Pune Crime News: अंगावर खाकी, खांद्यावर स्टार अन् दाखवत होती रुबाब; पुण्यात तोतया 'लेडी सिंघम'चा पर्दाफाश, नेमकं काय घडलं?
अंगावर खाकी, खांद्यावर स्टार अन् दाखवत होती रुबाब; पुण्यात तोतया 'लेडी सिंघम'चा पर्दाफाश, नेमकं काय घडलं?
Share Market Crash : अमेरिकेत AI कंपन्यांचा फुगा फुटला, 2026 मधील सर्वात मोठी घसरण, भारताला फायदा होणार, तज्ज्ञांनी काय सांगितलं?
अमेरिकेत AI कंपन्यांचा फुगा फुटला, 2026 मधील सर्वात मोठी घसरण, भारताला फायदा होणार, तज्ज्ञांनी काय सांगितलं?
Nagpur Crime: नागपूरमध्ये देवीच्या मंदिरात चोरी, पाया पडल्यानंतर चोराने गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र खेचलं, पाहा PHOTOs
नागपूरमध्ये देवीच्या मंदिरात चोरी, पाया पडल्यानंतर चोराने गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र खेचलं, पाहा PHOTOs
Embed widget