एक्स्प्लोर

पैसे दिले तर काजू, किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे,धनुष्यबाणाचे बटन दाबायचे; आमदार सत्तारांचे मतदारांना आवाहन

शिवसेना नेते माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार हे नेहमी त्यांच्या बेताल वक्तव्याने चर्चेत असता. आता, निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने त्यांनी असंच एक वक्तव्य जालना जिल्ह्यातील अंबड येथे केले.

जालना : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Election) रणधुमाळी सुरू असून प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील बडे नेते, मंत्री, खासदार प्रचारासाठी नगरपालिका क्षेत्रात जाऊन मतदारांना आवाहन करत आहेत. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक प्रचार थांबल्यानंतर लक्ष्मीदर्शन होणार असल्याचे म्हटले. तर, दुसरीकडे आमच्या उमेदवाराला निवडून द्या, निधी देऊ असे आश्वासन सत्ताधारी पक्षाच्या नेत्याकडून दिले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश तालुक्यात पैशांचा विषय निघत आहे. कुणी म्हणतय, मताला 1 हजार तर कुणी म्हणतय मताला 2 हजारांचा भाव निघालाय. आता, राज्याचे माजी मंत्री तथा शिवसेना आमदार अब्दुल सत्तार (Abdul sattar) यांनीही निवडणुकीतील पैशांवरुन भाष्य केलं आहे. 

शिवसेना नेते माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार हे नेहमी त्यांच्या बेताल वक्तव्याने चर्चेत असता. आता, निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने त्यांनी असंच एक वक्तव्य जालना जिल्ह्यातील अंबड येथे केले. येथे नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना महायुतीच्या नगरध्यक्षपदाच्या उमेदवार सना मुस्तकीन पटेल यांच्यासाठी त्यांनी सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, समोरचे जे पैसे देत आहेत ते काही त्यांच्या बापाच्या तिजोरीतून देत नाहीत,आपल्या तिजोरीतून खाल्लेले आहेत. त्यांनी पैसे दिले तर काजू, किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे आणि धनुष्यबाणाचे बटन दाबायचे असे वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. 

गुलाबराव पाटील यांचेही वादग्रस्त वक्तव्य - गुलाबराव पाटील

निवडणुकीच्या काळात तुम्हाला मटण देतील, ते खा. पण बटण आमचेच दाबा, नगरविकास आमच्याकडे आहे, नगरविकास विभागाकडे खूप माल आहे, त्यामुळे उठ भक्ता 1 तारखेला लक्ष्मी येणार, असे वादग्रस्त वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाशिक येथील सभेत केले होते. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सारवासारव केली. नगरपालिका क्षेत्राचा विकास नगरविकास खाते करते, त्यामुळे नगरविकास खाते महत्त्वाचं आहे, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले होते. दरम्यान, राज्यातील नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारात यंदा पैशाचा आणि विविध आमिष दाखवण्याचा जोर दिसत असून नेतेमंडळींकडून आश्वासनं दिली जात आहेत. 

हेही वाचा

शिर्डीतील साईबाबांच्या प्रसादाबाबत सुजय विखे-पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य, पुन्हा वादाला तोंड फोडलं, म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

सोलापुरात महायुतीची बैठक, शरद पवारांच्या गटाचे तीन आमदार उपस्थित, मोहित पाटील पडले एकाकी
सोलापुरात महायुतीची बैठक, शरद पवारांच्या गटाचे तीन आमदार उपस्थित, मोहित पाटील पडले एकाकी
Sunetra Pawar VIDEO : आतापर्यंत सगळं समजून घेतलं, यापुढे कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप होत असेल तर विचार केला जाईल; सुनेत्रा पवारांचा नेत्यांना इशारा
आतापर्यंत सगळं समजून घेतलं, यापुढे कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप होत असेल तर विचार केला जाईल; सुनेत्रा पवारांचा नेत्यांना इशारा
पक्षाच्या हिताला प्राधान्य देऊन कार्यकर्त्यांना संधी देणार, अजितदादांप्रमाणे कडक निर्णय घेणार : सुनेत्रा पवार
पक्षाच्या हिताला प्राधान्य देऊन कार्यकर्त्यांना संधी देणार, अजितदादांप्रमाणे कडक निर्णय घेणार : सुनेत्रा पवार
Chhagan Bhujbal : राजकारणाचा खेळ करू नका, भुजबळांचा तटकरेंना टोला; संपूर्ण भाषणात शरद पवारांचे दाखले, आता निष्ठा सुनेत्रा पवारांच्या चरणी
राजकारणाचा खेळ करू नका, भुजबळांचा तटकरेंना टोला; संपूर्ण भाषणात शरद पवारांचे दाखले, आता निष्ठा सुनेत्रा पवारांच्या चरणी

व्हिडीओ

Abhijeet Dipke interview : भाजप सोडून सगळे पाकिस्तानी का? अराजकता कोण पसरवतंय? - ABP Majha
Sanjay Raut On Abhijeet Dipke : अभिजीत दिपके-नरेंद्र मोदींची अमेरिकेत भेट झाली, राऊतांचा खळबळजनक दावा
Abhijeet Dipke PC :कुठे कुठे आंदोलन करणार? टार्गेटकाय? अभिजीत दिपकेंची पत्रकार परिषद
Cab driver attacks senior citizen in Thane : वृद्धाला मारहाण साफ करा ही 'घाण' | Special Report
Vidhan Parishad Drama : विधान परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ सुरुच | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nikhil Chaudhary: भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
India A vs Afghanistan A: कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
Cockroach Janta Party : पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2026 | गुरुवार
भारतीय कर्मचारी असलेल्या तिसऱ्या जहाजावर अमेरिकन नौदलाचा हल्ला, आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू; भारताने अमेरिकेच्या राजदूतांना फटकारलं, हल्ले तत्काळ थांबवण्यास सांगितलं
भारतीय कर्मचारी असलेल्या तिसऱ्या जहाजावर अमेरिकन नौदलाचा हल्ला, आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू; भारताने अमेरिकेच्या राजदूतांना फटकारलं, हल्ले तत्काळ थांबवण्यास सांगितलं
Prasad Vedpathak: सार्वजनिक ठिकाणच्या जैनांच्या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात गांधीगिरी करणाऱ्या प्रसाद वेदपाठकचं इन्स्टा अकाउंट सस्पेन्ड!
सार्वजनिक ठिकाणच्या जैनांच्या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात गांधीगिरी करणाऱ्या प्रसाद वेदपाठकचं इन्स्टा अकाउंट सस्पेन्ड!
जिम मालकावर अवघ्या 5 सेकंदात 10 गोळ्या झाडल्या, वर्षापूर्वीच लव्ह मॅरेज, मेहुण्याची चौकशी सुरू; जिमच्या पायऱ्यांवर वॉर्म-अप करून घेत असतानाच पाठीमागून धडाधड गोळ्या झाडल्या
जिम मालकावर अवघ्या 5 सेकंदात 10 गोळ्या झाडल्या, वर्षापूर्वीच लव्ह मॅरेज, मेहुण्याची चौकशी सुरू; जिमच्या पायऱ्यांवर वॉर्म-अप करून घेत असतानाच पाठीमागून धडाधड गोळ्या झाडल्या
'मी खरं बोललो, तर मोठ्या संकटात सापडेन, ती खूप मोठी लोकं, सत्य सांगायचं धाडस आमच्यात नाही..' राम मंदिरातील दानपेटीतील कथित चोरीवरून बृजभूषण सिंहांच्या वक्तव्याने खळबळ
'मी खरं बोललो, तर मोठ्या संकटात सापडेन, ती खूप मोठी लोकं, सत्य सांगायचं धाडस आमच्यात नाही..' राम मंदिरातील दानपेटीतील कथित चोरीवरून बृजभूषण सिंहांच्या वक्तव्याने खळबळ
Embed widget