एक्स्प्लोर

Kolhapur News: नामवंत शाळेतील मास्तर महिलेसोबत रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी पहिल्यांदा बेदम चोपला मग नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला!

Kolhapur Crime: इचलकरंजीतील एका प्रसिद्ध शाळेत कार्यरत असलेल्या या तरुण शिक्षकाचे संबंधित महिलेसोबत बरेच दिवस संबंध असल्याचा संशय घरच्यांना होता.

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील टाकवडेत एका शिक्षकाला महिलेचा नाद चांगलाच महागात पडला आहे. महिलेच्या घरी अनैतिक संबंधातून नातेवाइकांनी रंगेहाथ पकडले. संतापलेल्या नातलगांनी त्याला बेदम मारहाण करीत दोरीने बांधून घरातच बंद केले. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला. रात्री साडेदहाच्या सुमारास पोलिसांनी त्या शिक्षकाला ताब्यात घेतले. या संपूर्ण घटनेमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिक्षकाविरुद्ध गुन्हा  नोंदवण्यात आला आहे.

महिलेसोबत बरेच दिवस संबंध असल्याचा संशय 

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इचलकरंजीतील एका प्रसिद्ध शाळेत कार्यरत असलेल्या या तरुण शिक्षकाचे संबंधित महिलेसोबत बरेच दिवस संबंध असल्याचा संशय घरच्यांना होता. अनेकदा ताकीद देऊनही परिस्थिती न बदलल्याने नातेवाइकांचा रंगेहाथ सापडताच उद्रेक झाला. शुक्रवारी सायंकाळी तो महिलेच्या घरी आल्याचे पाहताच घरच्यांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली आणि नग्न अवस्थेत बांधून ठेवले.

पोलिसांनी शिक्षकाची सुटका करून पोलीस ठाण्यात नेलं

प्रसंगाची माहिती पसरताच परिसरातील लोक मोठ्या संख्येने घरासमोर जमा झाले. काही नागरिकांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलेच्या नातलगांनी गुन्हा दाखल करण्यावर ठाम भूमिका घेतली. वाढत्या जमावामुळे परिस्थिती बिघडू नये म्हणून शिरोळ पोलिसांनी मोठा बंदोबस्तासह घटनास्थळी धाव घेतली. तीन तासांहून अधिक वेळ चाललेल्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी शिक्षकाची सुटका करून त्याला पोलीस ठाण्यात सुरक्षितरित्या हलवले.

स्मशानभूमीत तिरडीच्या काठ्या काढून डोके फुटेपर्यंत हाणामारी

दरम्यान, कोल्हापुरात पंचगंगा स्मशानभूमीत बुधवारी रक्षाविसर्जनाला आलेल्या नातेवाइकांत काठ्यांनी डोकी फुटेपर्यंत हाणामारी झाली. यात इचलकरंजीचे चौघेजण जखमी झाले. अंत्यसंस्कारासाठी वापरलेल्या तिरडीच्या काठ्या काढून ही हाणामारी झाली. या हाणामारीत विकास रामचंद्र गेजगे, निवास रामचंद्र गेजगे, सुनंदा दगडू पारसे, पूजा दगडू पारसे हे चौघे जण जखमी झाले. अंत्यसंस्कारासाठी उशिरा आल्याच्या कारणावरून ही हाणामारी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. गेजगे यांची बहीण अलका बाळू करडे यांचे 25 नोव्हेंबर रोजी निधन झाले. मंगळवारीच पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी रक्षाविसर्जनासाठी इचलकरंजीहून नातेवाईक आले. त्यावेळी मृत करडे यांच्या नणंदेच्या मुलांनी व इतरांनी ‘तुम्ही रक्षाविसर्जनाला वेळेत का आला नाही?’ अशी विचारणा केली. यावरून वाद सुरू झाला. शब्दाने शब्द वाढत जाऊन प्रकरण हमरीतुमरीवर आले. नंतर थेट काठ्यांनी मारहाण केली. दोन्ही बाजूकडून हाणामारी सुरू झाल्याने स्मशानभूमीत पळापळ झाली.  

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
Kolhapur City Boundary Expansion: कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget