एक्स्प्लोर

Gold Rate : सोन्याच्या दरात तेजी सुरु, सोनं 1360 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या

Gold Price: सोन्याच्या दरात पुन्हा तेजी सुरु झाली आहे. सलग दोन दिवस सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. तज्ज्ञांच्या मते सोने दरातील तेजी कायम राहील.  

Gold Jewellery Price नवी दिल्ली : भारतात लग्न सराई जशी जवळ येत आहे, त्यानुसार सोने दर वाढत आहेत. सलग दोन दिवस सोन्याचे दर वाढल्यानं 24 कॅरेट सोनं  1 लाख  30 हजारांवर पोहोचलं आहे. नोव्हेंबर ते मार्च महिन्यात चालणाऱ्या लग्नसराईच्या हंगामात देशभरात सोन्याची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. 

तज्ज्ञांच्या मते सोन्याचे दर पुन्हा एकदा उच्चांक गाठू शकतात.  सोन्याच्या दराचा आताचा ट्रेंड  दर आणखी वाढतील असं दाखवत असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सोन्याचे दर पुन्हा उच्चांक गाठू शकतात. सोन्याच्या दरानं 19 मार्च 2025 ला उच्चांक गाठला होता.  

24 k Gold Rate : 24 कॅरेट सोन्याचा दर

शनिवार म्हणजे आज (29 नोव्हेंबर) ला सोन्याच्या दर 1360 रुपयांनी वाढून 129920 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचवेली 100 ग्रॅम सोन्याच्या दरात 13600 रुपयांची वाढ झाली असून ते 12,98,200 रुपयांवर पोहोचलं आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात तेजी पाहायला मिळत आहे.  

काल  म्हणजेच शुक्रवारी (28 नोव्हेंबर) 10 ग्रॅम सोन्याचे दर 710 रुपयांनी वाढले होते. तर, 100 ग्रॅम सोन्याच्या दरात 7100 रुपयांची वाढ झाली होती. म्हणजेच दोन दिवसात 24 कॅरेट सोन्याच्या एक तोळ्याच्या दरात 2070 रुपयांची वाढ झाली. तर, 10 तोळ्याच्या दरात 20700 रुपये वाढले आहेत. 8 ग्रॅम सोन्याचा दर 103856 रुपये असून 1 ग्रॅम सोन्याचा दर 12982 रुपये इतका आहे.  

22 आणि 18 कॅरेट सोन्याचा दर  

24 कॅरेटच नव्हे 22 कॅरेट सोन्याच्या दरात देखील वाढ झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा 100 ग्रॅमचा दर 12500 रुपयांनी वाढला आहे. तर, एका तोळ्याच्या सोन्याच्या दरात 1250 रुपयांची वाढ झाली आहे. 22 कॅरेट सोन्याच्या 10 तोळ्याचा दर 10,90,000 रुपये इतका आहे. तर, एका तोळ्याचा दर 119000 रुपये आहे. तर, एका तोळ्याचा दर 11900 रुपये इतका आहे. 

18 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 1030 रुपयांनी वाढून 97370 रुपयांवर पोहोचला. 10 तोळ्याच्या दरात 10300 रुपयांची वाढ झाली. 10 तोळे  18 कॅरेट सोन्यासाठी 973700 रुपये मोजावे लागतील.  

Silver Rate : चांदीच्या दराची काय स्थिती?

सोन्याप्रमाणं चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. चांदीचे दर 9000 रुपयांनी वाढले आहेत. एक किलो चांदीचा दर 185000 रुपयांवर पोहोचला आहे. 100 ग्रॅम चांदीसाठी 18500 तर 10 ग्रॅम चांदीसाठी 1850 रुपये मोजावे लागतील.

दरम्यान, 2025 मध्ये सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळाला आहे. सोन्याचे दर 75 हजार रुपयांवरुन 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. बाजारातील अनिश्चिततेच्या काळात सोन्यातील गुंतवणूक वाढत असल्याचं पाहायला मिळतं.  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : कालच्या धक्क्यानंतर आज शेअर बाजार सावरला, एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई,कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक,एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई, कोणत्या शेअरमध्ये तेजी?
Mutual Fund Update : सेक्टोरल म्युच्युअल फंडांची धूम! 'या' वित्तीय सेवा फंडांनी एका वर्षात दिला बंपर परतावा; पाहा टॉप 5 फंड
सेक्टोरल म्युच्युअल फंडांची धूम! 'या' वित्तीय सेवा फंडांनी एका वर्षात दिला बंपर परतावा; पाहा टॉप 5 फंड
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर

व्हिडीओ

Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी
Embed widget