एक्स्प्लोर

भाजपचा एखादा नगरसेवक निवडून आला तर खूप झालं; जळगावात भाजप अन् शिवसेनेत जुंपली, नेते आमने-सामने

जळगावातील भाजप आमदार किशोर पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यावरुन पटलवार केला. तसेच, भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यावरही बोचरी टीका केली.

जळगाव : राज्यातील काही नगरपालिकांमध्ये शिवसेना महायुतीमध्ये गडबड झाल्याने स्थानिक स्तरावर निर्णय घेऊन भाजप (BJP) विरुद्ध शिवसेना (Shivsena) असाच सामना रंगला आहे. त्यामध्ये, जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातही राजकीय वातावरण तापले असून भाजप आणि शिवसेना नेते आमने-सामने आले आहेत. दोन नंबर धंदे करणारा आमचा एक जरी उमेदवार उभा असेल तर त्यांनी नाव घेऊन सांगावं, मी समोरच्याला बिनविरोध करेल. खोटं बोलायचं, लोकांची बदनामी करायचं हे काम भाजप करत आहे, अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना प्रत्युत्तर दिले. 

जळगावातील भाजप आमदार किशोर पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यावरुन पटलवार केला. तसेच, भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यावरही बोचरी टीका केली. आमचा एकही नगरसेवक निवडून येणार नाही असे म्हणणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं सारख आहे. भाजपचा एखादा नगरसेवक निवडून आला तर खूप झालं. माझं भाजपला चॅलेंज आहे, भडगाव, पाचोरा या दोन्ही नगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल. रवींद्र चव्हाण यांनी युती टिकवायची की नाही, हा महाराष्ट्राचा विषय आहे. परंतु, युती टिकवायची नाही हे मी 1 नोव्हेंबरलाच जाहीर केलेलं आहे, असे म्हणत किशोर पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. गद्दारांशी दोस्ती करून पाठीत खंजीर खुपसून घेण्यापेक्षा एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या, असेही त्यांनी म्हटले. 

चाळीसगाव नगर परिषदेत शिवसेनेचे शिंदे गटाचे जे उमेदवार उभे आहेत, त्यांना महाविकास आघाडीकडून उभं करण्याचा माझा प्रयत्न होता. मी माझ्या लोकांच्या विरोधात चाळीसगावमध्ये आलो नाही तर महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ इथे आलो आहे, असे म्हणत येथे त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देत भाजपविरुद्ध भूमिका घेतली. 

किशोर पाटील यांच्यावर पलटवार

त्यांची रात्रीची उतरली नसेल, कोणतीही व्यक्ती सांगेल उन्मेश पाटलांना राजकारणात कोणी मदत केली आहे. उन्मेष पाटलांनी सांगावं की मी त्यांची बॅग धरली आहे. आम्ही उन्मेष पाटलांच्या मागे पाठबळ उभा करून त्यांना आमदार केलं. आम्ही त्यांना आमच्या घरच्या बॅगा दिल्या, त्यांच्या बॅगा धरायचा प्रश्नच येत नाही. उन्मेष पाटील मोठा नेता नव्हता, त्याला आम्ही सर्वांनी मदत केली आहे. किशोर पाटलांची रात्रीची उतरली नसेल म्हणून ते बोलले असेल, असा मंगेश चव्हाण यांनी म्हटले. 2019 च्या निवडणुकीत किशोर पाटीलच अडीच हजार मतांनी निवडून आले होते ते मला काय निवडून आणतील. या सर्व लोकांना मी डोईजड व्हायला लागलो आहे ही वस्तुस्थिती आहे. चाळीसगावची जनता सुज्ञ आहे, हे पार्सल पाचोर्‍याला जाईल चिंता करायची नाही, किशोर पाटील यांना सांगा 3 तारखेला आपण भेटू, अशा शब्दात भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनीही किशोर पाटील यांच्यावर जोरदार पलटवार केला.  

हेही वाचा

पैसे दिले तर काजू, किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे,धनुष्यबाणाचे बटन दाबायचे; आमदार सत्तारांचे मतदारांना आवाहन

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
Praniti Shinde: सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम् न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम् न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Embed widget