(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2024 SRH vs RR: 6 चेंडूत 13 धावा, मग 1 चेंडूत 2 धावांची गरज...; शेवटच्या षटकात थरार, काव्य मारनचं हटके सेलिब्रेशन!
IPL 2024 SRH vs RR: राजस्थानला विजयासाठी शेवटच्या षटकांत 13 धावांची गरज होती. हैजराबादकडून अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने शेवटचं षटक टाकलं.
IPL 2024 SRH vs RR: सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) काल झालेल्या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) 1 धावाने पराभव केला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात हैदराबादने राजस्थानचा अवघ्या एका धावेनं पराभव केलाय. हैदराबादने दिलेल्या 202 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 200 धावांपर्यंत मजल मारु शकला.
राजस्थानला विजयासाठी शेवटच्या षटकांत 13 धावांची गरज होती. हैजराबादकडून अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने शेवटचं षटक टाकलं. राजस्थानच्या रोव्हमन पॉवेल पहिल्या पाच चेंडूत 11 धावा काढल्या. यानंतर एका चेंडू 2 धावांची गरज असताना भुवनेश्वर कुमारने भेदक मारा करत पॉवेलला बाद केले आणि हैदराबादला विजय मिळवून दिला. हैदराबादच्या या विजयानंतर मालकीण काव्या मारन (Kavya Maran) खूप आनंदी दिसली. तिने मैदानावर जोरदार सेलिब्रेशनही केले.
Celebrations from Kavya Maran after a fantastic win. pic.twitter.com/JlrqQ6gcvQ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 2, 2024
शेवटच्या षटकाचा थरार-
पहिला चेंडू- एक धाव
दुसरा चेंडू- दोन धावा
तिसरा चेंडू - चौकार
चौथा चेंडू- दोन धावा
पाचवा चेंडू- दोन धावा
सहावा चेंडू- LBW बाद
#TATAIPL Matches 📂
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2024
↳ Last Ball Thrillers 📂
Bhuvneshwar Kumar wins it for @SunRisers 👌👏
Recap the Match on @StarSportsIndia and @JioCinema 💻📱#SRHvRR pic.twitter.com/mHdbR2K3SH
भुवनेश्वर कुमार ठरला हैदराबादच्या विजयाचा हिरो-
राजस्थानला 201 धावांचं लक्ष दिल्यानंतर या धावसंख्येचा बचाव करण्याची जबाबदारी सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजीवर आली. अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकांत राजस्थानला दोन मोठे धक्के दिले. दुसऱ्या चेंडूवर जोस बटलर खाते न उघडता बाद झाला आणि पाचव्या चेंडूवर संजू सॅमसन पहिल्याच चेंडूवर 0 धावांवर त्रिफळाचीत झाला. पहिल्या षटकानंतर राजस्थानची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात केवळ एक धाव होती. भुवनेश्वर कुमारने चार षटकांत एकूण 41 धावा देत तीन महत्त्वाचे बळी घेतले.
हैदराबादने 201 धावा केल्या-
राजस्थानविरुद्ध हैदराबादने 201 धावा केल्या. भारताच्या टी-20 विश्वचषक संघात स्थान मिळवणारा युझवेंद्र चहलला हैदराबादच्या फलंदाजांनी चांगलेच धुतले. त्याने चार षटकांत 62 धावा दिल्या.नितीश कुमार रेड्डीने 42 चेंडूत आठ षटकार आणि तीन चौकारांसह नाबाद 76 धावांची कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली. हेडसह तिसऱ्या विकेटसाठी 96 धावा जोडण्याबरोबरच हेन्रिक क्लासेन (19 चेंडूत नाबाद 42, तीन षटकार, तीन चौकार) सोबत चौथ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारीही केली.
बॅट हवेत असूनही ट्रॅव्हिस हेडला अम्पायरने नाबाद दिले-
आवेश खानच्या गोलंदाजीवर ट्रॅव्हिड हेड फटका मारण्यासाठी पुढे गेला, परंतु चेंडू यष्टिरक्षक संजू सॅमसनच्या हाती विसावला. संजूने चतुराईने रन आऊट केले. पण, तिसऱ्या अम्पायरने हेडला नाबाद दिले. रिप्लेमध्ये चेंडू जेव्हा स्टम्पवर आदळला तेव्हा हेडची बॅट किंचीत हवेत होती. तरीही त्याला नाबाद दिले. डगआऊटमध्ये बसलेला राजस्थान रॉयल्सचा मार्गदर्शक कुमार संगकाराने पंचांशी वाद घालण्यास सुरुवात केली, या निर्णयाचा निषेध केला जात होता, मात्र पुढच्याच चेंडूवर वेगवान गोलंदाज आवेश खानने हेडला बाद करत बदला पूर्ण केला.
संबंधित बातम्या:
विश्वचषकासाठी बुमराहला उपकर्णधार बनवा; इरफान पांड्याच्या हात धुवून मागे लागला, आता काय म्हणाला?
बॅट हवेत असूनही ट्रॅव्हिस हेडला अम्पायरने नाबाद दिले; इरफान पठाण म्हणाला, हे भयानक..., पाहा Video