Irfan Pathan On Hardik Pandya: विश्वचषकासाठी बुमराहला उपकर्णधार बनवा; इरफान पांड्याच्या हात धुवून मागे लागला, आता काय म्हणाला?
Irfan Pathan On Hardik Pandya: आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) उपकर्णधार पदाची धुरा देण्यात आली आहे.
Irfan Pathan On Hardik Pandya: आगामी आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup 2024) बीसीसीआयने भारतीय संघाची नुकतीच घोषणा केली. या विश्वचषकाच्या स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) उपकर्णधार पदाची धुरा देण्यात आली आहे.
आयपीएल 2024 च्या हंगामात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये हार्दिक पांड्या साजेशी कामगिरी केली नाहीय. याशिवाय हार्दिक पांड्या कर्णधार म्हणून आपली छाप सोडू शकलेला नाही. यामुळे भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने हार्दिक पांड्यावर टीका केली आहे. तसेच भारतीय संघाच्या उपकर्णधार पदासाठी नवीन नाव सुचवलं आहे.
इरफान पठाण काय म्हणाला?
आता भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने हार्दिक पांड्यावर निशाणा साधला आहे. आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्याऐवजी जसप्रीत बुमराहला टीम इंडियाचा उपकर्णधार बनवायला हवे, असे इरफान पठाणचे मत आहे. जसप्रीत बुमराह हा हार्दिक पांड्यापेक्षा चांगला पर्याय असल्याचं इरफान पठाणने सांगितले.
एका खेळाडूला विशेष वागणूक...
हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली युवा संघ तयार करणे हा यामागचा उद्देश होता, मात्र हार्दिक पांड्याच्या कामगिरीवर आणि क्रिकेटमधील बांधिलकीवर प्रश्न उपस्थित केले. वर्षभर भारतीय क्रिकेट खेळण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये नियमित सहभाग महत्त्वाचा आहे, असं इरफान पठाण म्हणाला. जेव्हा खेळाडू पाहतात की एका खेळाडूला विशेष वागणूक मिळत आहे, तेव्हा ते संघाचे वातावरण बिघडवते. क्रिकेट हा टेनिससारखा नाही, हा एक सांघिक खेळ आहे जिथे समानता अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक खेळाडूला न्याय आणि समानतेने वागवले पाहिजे, असं स्पष्ट मत इरफान पठाणने व्यक्त केले.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू-
शुभमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद
भारतीय संघाचे वेळापत्रक
5 जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
9 जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
12 जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
15 जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा