(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut PC | पाशवी बहुमत देशाला, राज्याला हानीकारक; युज अँड थ्रो हे भाजपचं धोरण- संजय राऊत
Sanjay Raut PC | पाशवी बहुमत देशाला, राज्याला हानीकारक; युज अँड थ्रो हे भाजपचं धोरण- संजय राऊत
सर्वोच्च न्यायालयात कोणत्या याचिकेवर सुनावणी करावी हे एखादा राजकीय पक्ष ठरवणार का असा सवाल विचारत माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं. आपल्या काळात अनेक महत्त्वाच्या खटल्यांवर निकाल देण्यात आल्याचंही ते म्हणाले. महाराष्ट्रात जे घडलं त्याला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड जबाबदार असल्याची टीका विधानसभेच्या निकालानंतर संजय राऊतांनी केली होती. त्या टीकेला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी प्रत्युत्तर दिलंय.
आपल्या कार्यकाळात नऊ सदस्यीय खंडपीठ आणि सात सदस्यीय खंडपीठाने महत्त्वाच्या घटनात्मक विषयांवर निर्णय दिले. एखादा राजकीय पक्ष किंवा व्यक्ती ठरवणार का सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या याचिकांवर सुनावणी करावी. मला माफ करा, पण हा अधिकार सरन्यायाधीशांकडे असतो असं प्रत्युत्तर चंद्रचूड यांनी दिलंय. माझ्या कार्यकळात निवडणूक रोखे यावर निर्णय झाला. तो काही कमी महत्त्वाचा होता का? असा प्रती सवालही त्यांनी उपस्थित केलाय.