IPL 2022 : नारायणपुढे दिग्गज फलंदाजही टेकतात गुडघे, पाहा आकडे
IPL Marathi News : मागील काही वर्षांपासून नारायण कोलकात्यासाठी मॅचविनरची भूमिका पार पाडत आहे. सुनील नारायणची गोलंदाजी समजणे दिग्गज फंलदाजांनाही कठीण जातेय.
Spin King Sunil Narine IPL : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील कोलकाता संघाची यंदाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. कोलकात्याला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी कोलकात्याचा संघर्ष सुरु आहे. अंतिम 4 मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कोलकात्याला उर्वरित सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. तसेच इतर संघाच्या कामगिरीवरही अवलंबून राहावे लागेल.. यंदाच्या हंगामात कोलकाता संघ संतुलित दिसला नाही... आतापर्यंत तब्बल 22 खेळाडूंना मैदानात उतरवले आहे. यंदाच्या दहा संघामध्ये सर्वाधिक बदल कोलकाता संघात दिसले.. पण संघात बदल होत असताना... फिरकीपटू सुनील नारायण याने आपल्या कामगिरीने प्रभावित केलेय... मागील काही वर्षांपासून नारायण कोलकात्यासाठी मॅचविनरची भूमिका पार पाडत आहे. सुनील नारायणची गोलंदाजी समजणे दिग्गज फंलदाजांनाही कठीण जातेय.. नारायणच्या गुगलीपुढे अनेक फलंदाजांनी गुडघे टेकलेत..
यंदाच्या हंगामात प्रभावी कामगिरी -
सुनील नारायणने यंदाच्या हंगामातही प्रभावी मारा केलाय. नारायणची गोलंदाजी फलंदाजांना समजत नाही... त्याच्या गोलंदाजीवर फलंदाज सावध खेळताता.. नारायण याने 12 सामन्यात फक्त 8 विकेट घेतल्या आहेत.. यादरम्यान त्याने प्रति षटक फक्त 5.25 धावा खर्च केल्या आहेत.. यावरुन नारायणची गोलंदाजी किती प्रभावी असेल, याचा अंदाज लागतो.. कोणताच फलंदाज नारायणविरोधात रिस्क घेत नाही...
आयपीएलमधील कामगिरी -
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कंजूष गोलंदाजापैकी एक म्हणून नारायणला ओळखले जाते... नारायणचा इकॉनमी कधीच 8 पेक्षा जास्त झाला नाही. मागील दहा वर्षांपासून नारायण कोलकाता नाइट रायडर्स संघाचा सदस्य आहे. नारायणने कोलकाताकडून 146 सामने खेळले आहेत. यादरम्यान 6.61 च्या इकॉनमीने 151 विकेट घेतल्या आहेत. नारायणने आयपीएल करिअरमध्ये सात वेळा चार विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. तर एक वेळा पाच विकेट घेतल्या आहेत. सुनील नारायणच्या गोलंदाजी शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते, पण त्याने यशस्वी पुनरागमन केलेय.