Shubman Gill: शुभमन गिलनं मनं जिंकली, अभिषेक शर्माच्या आईच्या पाया पडून नमस्कार, नेटकऱ्यांचा कौतुकाचा वर्षाव, पाहा व्हिडीओ
Shubhman Gill : गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील मॅच पावसामुळं रद्द झाली.या मॅचनंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भेटले होते.
हैदराबाद : आयपीएलमध्ये (IPL 2024) काल सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यातील मॅच पावसामुळं रद्द झाली. सनरायजर्स हैदराबादला 1 गुण मिळाल्यानं त्यांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला. प्लेऑफमध्ये प्रवेश करणारी हैदराबाद ही तिसरी टीम ठरली आहे. सनरायजर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांनी प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलं आहे. मॅच पावसानं रद्द झाल्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू आणि त्यांचे कुटुंबीय यांची भेट झाली. शुभमन गिलनं (Shubhman Gill) सनरायजर्स हैदराबादचा ऑलराऊंडर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याच्या आई आणि बहिणीची भेट घेतली. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवरील या भेटीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पावसामुळं मॅच रद्द झाल्यानंतर अभिषेक शर्मा शुभमन गिलला घेऊन त्याची आई मंजू शर्मा आणि बहीण कोमल यांच्या भेटीसाठी गेला होता. अभिषेक शर्माचे कुटुंबीय शुभमन गिलला पाहून आनंदी झाले. शर्मा कुटुंबीयांनी शुभमन गिलचं उत्साहात स्वागत केलं. शुभमन गिल अभिषेक शर्माची आई मंजू यांच्या पाया पडला आणि त्यानं आशीर्वाद घेतले.
शुभमन गिलनं अभिषेक शर्माची आई मंजू यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर त्याची बहीण हिच्याशी हस्तोंदलन केलं. मंजू शर्मा यांनी देखील शुभमन गिलला पाठ थोटपटून आशीर्वाद दिले.
पाहा व्हिडीओ :
This ❤️❤️
— Ash (@_ashevor77) May 16, 2024
Shubman Abhishek and his family pic.twitter.com/c1YlmJloBY
शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांचे कुटुंबीय जाहीरपणे पहिल्यांदा भेटले आहेत. मात्र, अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल दोघेही चांगले मित्र आहेत. दोघांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 2017 मध्ये पंजाबच्या टीममधून पदार्पण केलं होतं. दोघांनी अंडर 19 वर्ल्डकप 2018 मध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. तो वर्ल्ड कप भारतानं जिंकला होता. शुभमन गिलनं त्या स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यानंतर शुभमन गिलला भारताच्या मुख्य संघात स्थान मिळालं होतं.
सनरायजर्स हैदराबाद प्लेऑफमध्ये
सनरायजर्स हैदराबाद गेल्या हंमामात दहाव्या स्थानावर होतं. पॅट कमिन्सनं सनरायजर्स हैदराबादचं नेतृत्त्व स्वीकारत बदल करुन दाखवले आहेत. सनरायजर्स हैदराबादनं प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर हैदराबादनं ही कामगिरी करुन दाखवली. आता सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध प्लेऑफमध्ये कुणाचा सामना होणार हे उद्या होणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील मॅचच्या निकालावर अवलंबून असेल.
दरम्यान, गुजरात टायटन्ससाठी यंदाचं आयपीएल निराशाजनक ठरलं. 2022 मध्ये गुजरातनं विजय मिळवला होता. 2023 मध्ये उपविजेता राहिलेल्या गुजरातला यावेळी प्लेऑफमध्ये प्रवेश देखील मिळाला नाही.
संबंधित बातम्या :
MI vs LSG : वानखेडेवर मुंबई लखनौ आमने सामने, राहुलची टीम जिंकल्यास प्लेऑफचं समीकरण कसं असणार?