(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चेन्नई अन् बंगळुरुच्या सामन्यात पाऊस पडल्यास चिंता नाही...; 1 मिनिटात 10 हजार लिटर पाणी सुकवण्याची व्यवस्था
IPL 2024 CSK vs RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील एक संघ प्ले ऑफमध्ये दाखल होणार आहे.
IPL 2024 CSK vs RCB: आयपीएलमधील प्ले ऑफच्या फेरीसाठी कोलकाता नाइट रायडर्स (KKR), राजस्थान रॉयल्स (RR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) या तीन संघांचं स्थान निश्चित झालं आहे. आता प्ले ऑफसाठी एक जागा शिल्लक आहे आणि शर्यतीत दोन संघ आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील एक संघ प्ले ऑफमध्ये दाखल होणार आहे.
चेन्नई आणि आरसीबीचा सामना उद्या बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी मैदानावर होणार आहे. दोन्ही संघ आयपीएलमधील अंतिम सामना असल्यासारखी कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत. मात्र हवामान विभागाने सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवली आहे. पण एक चांगली गोष्ट म्हणजे हा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे आणि इथली ड्रेनेज व्यवस्था खूप चांगली आहे. यासाठी तयारी देखील चिन्नास्वामी मैदानातील सदस्यांनी सुरु केली आहे.
1 मिनिटांत 10 हजार लिटर पाणी सुकणार -
क्रिकइन्फोच्या बातमीनुसार, एका अमेरिकन कंपनीने एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सबसरफेस एरेशन सिस्टम बसवले आहे. याद्वारे मैदानात साचलेले 10 हजार लिटर पाणी 1 मिनिटात काढता येते. ड्रेनेज व्यवस्थेमुळे या स्टेडियममध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र ही यंत्रणा 2017 नंतर बसवण्यात आली. चेन्नई आणि बंगळुरू यांच्यातील सामन्यादरम्यान पाऊस पडला तर मैदान कमी वेळात खेळण्यायोग्य बनवता येईल.
Chinnaswamy Stadium has the best sub-air drainage and aeration system in the world♥️
— Ⓤನೌನ್_ಮಂದಿ💛❤️ (@unknown_trio) May 17, 2024
Let's hope for the best✌🏻#RCBvCSK #CSKvRCB #RCBvsCSK @RCBTweets pic.twitter.com/cj5h4WIfkf
प्ले ऑफच्या फेरीसाठी बंगळुरुचं समीकरण कसं असेल?
आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी अखेरचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. 18 मे रोजी आरसीबी आणि चेन्नई यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील विजेता संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहे. 18 मे रोजी बंगळुरुमध्ये त्यांचा सामना होणार आहे. चेन्नईने आरसीबीचा पराभव केला, तर ते थेट पात्र ठरणार आहेत. पण आरसीबीचा संघ मात्र समिकरणात अडकलाय. चेन्नईचा रनरेट चांगला आहे, त्यामुळे आरसीबीला मोठ्या फरकाने विजय नोंदवावा लागेल. जर प्रथम फलंदाजी केली तर आरसीबीला 18 धावांनी सामना जिंकावा लागेल. धावांचा पाठलाग करताना आरसीबीला 18.1 षटकात आव्हान पार करावे लागेल. हैदराबादच्या सामन्यावरही आरसीबीचं प्लेऑफचं गणित अवलंबून आहे. जर हैदराबादचा उर्वरित दोन्ही सामन्यात दारुण पराभव झाला तर आरसीबी आणि चेन्नई हे दोन्ही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरु शकतात.
इतर बातम्या:
IPL 2024: यंदा आयपीएलचं जेतेपद कोण पटकावणार?; ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने जाहीर केलं संघाचं नाव!
किमान 1 वर्ष तरी...; वरिष्ठ खेळाडूंची विनंती, पण राहुल द्रविडचा नकार, पुढील प्रशिक्षकपदी कोण?