Shashank Singh: 'श्रेयस अय्यरनं शिवी दिली, कानाखाली मारली असती तर...' पंजाब किंग्जच्या शशांक सिंहचं नवं वक्तव्य समोर
Shashank Singh IPL 2025 : पंजाब किंग्जचा युवा खेळाडू शशांक सिंह यानं आयपीएलच्या क्वालिफायर 2 मधील एका घटनेवर भाष्य केलं आहे. ती घटना श्रेयस अय्यर आणि शशांक सिंह यांच्यातील आहे.

IPL 2025 नवी दिल्ली : आयपीएलचा 18 हंगाम संपला आहे. आरसीबीनं पंजाब किंग्जला पराभूत करत पहिल्यांदा विजेतेपद मिळवलं. पंजाब किंग्जचं आयपीएल विजेतेपदाचं स्वप्न यामुळं भंगलं. पंजाब किंग्जनं क्वालिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्सला पराभूत केलं होतं. त्या मॅचमध्ये पंजाबचा कॅप्टन श्रेयस अय्यर यानं नाबाद 87 धावांची खेळी करत मुंबई इंडियन्सला पराभूत केलं होतं. या मॅचमधील एक प्रसंग जोरदार चर्चेत होता. पंजाबच्या विजयानंतर श्रेयस अय्यर आणि शशांक सिंह यांच्यातील प्रसंगाची जोरदार चर्चा झाली. श्रेयस अय्यरनं शशांक सिंहला शिवी दिली होती. आता शशांक सिंहची भूमिका समोर आली आहे.
पंजाबनं मुंबईला पराभूत केल्यानंतर श्रेयस अय्यर आणि शशांक सिंह आमने सामने आले होते. श्रेयस अय्यरनं शशांक सिंहला शिवी दिली होती. शशांक सिंह यानं त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे, तो म्हणाला निर्णायक मॅचमध्ये मोक्याच्या वेळी निष्काळजी असल्यानं शिवी मिळाली होती.निष्काळजीपणामुळं संघाला मॅच गमवावी लागली असती. कॅप्टननं शिवी दिली होती मात्र त्यानंतर दोघे डिनरला सोबत गेलो होतो, असं शशांक सिंह म्हणाला.
शशांक सिंह पुढं म्हणाला की, श्रेयस अय्यरनं माझ्या कानाखाली मारायला हवी होती, ते मी डिजर्व्ह करतो. माझ्या वडिलांनी देखील फायनलपर्यंत माझ्याबरोबर संवाद साधला नाही. मी निष्काळजी होतो, तो महत्त्वाचा वेळ होता. माझ्याकडून ही अपेक्षा नव्हती असं श्रेयसनं स्पष्टपणे सांगितलं त्यानंतर तो मला डिनरला घेऊन गेला, असं शशांक सिंह म्हणाला.
शशांक सिंहनं पंजाब किंग्जचा कॅप्टन श्रेयस अय्यरचं जोरदार कौतुक केलं. तो म्हणाला की सध्या क्रिकेट विश्वात श्रेयस अय्यरपेक्षा चांगला कर्णधार नाही. ड्रेसिंग रुममध्ये सर्व युवा खेळाडू त्याच्यासोबत सहजपणे चर्चा करतात. चांगल्या व्यक्तींकडून चांगला सल्ला घेण्यामध्ये श्रेयस अय्यर मागं राहत नाही, असं शशांक सिंहनं सांगितलं.
क्रिकेट विश्वात श्रेयस अय्यरसारखा दुसरा चांगला कॅप्टन नाही. तो आम्हाला स्वातंत्र्य देतो, सर्वांना बरोबरीची वागणूक देतो. श्रेयस अय्यरकडे एटिट्यूड नाही, असंही शशांक सिंह म्हणाला.
पंजाब किंग्जचा फायनलमध्ये पराभव
पंजाब किंग्जनं मुंबई इंडियन्सला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पंजाब किंग्ज आयपीएलमध्ये 14 वर्षानंतर प्रवेश केला होता. या फायनलमध्ये पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव झाला. आरसीबीनं 18 व्या हंगामाचं विजेतेपद मिळवलं. विशेष बाब म्हणजे फायनलच्या मॅचमध्ये 1 रन करुन बाद झाला होता.




















