RR vs SRH Playing 11 : हैदराबाद विरुद्ध राजस्थान, प्लेईंग 11 आणि खेळपट्टीबाबत जाणून घ्या
RR vs SRH Playing 11 : हैदराबाद विरुद्ध राजस्थान, प्लेईंग 11 आणि खेळपट्टीबाबत जाणून घ्या
RR vs SRH Playing 11 : आयपीएलमध्ये (IPL 2023) च्या 52 व्या सामन्यात रविवारी, 7 मे रोजी जयपूरमधील सवाई मानसिंग इनडोअर स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स (RR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सामना होणार आहे. राजस्थान आणि हैदराबाद हे दोन्ही संघ पराभवानंतर आजच्या सामन्यात उतरणार आहेत. राजस्थान रॉयल्स त्यांच्या शेवटच्या पाच सामन्यांआधी मजबूत स्थितीत होती. पण मागील पाच सामन्यांमध्ये संघाचा दमदार फॉर्म ढासळला आहे. तर, सनरायझर्स हैदराबाद संघ हंगामाच्या सुरुवातीपासूनच खराब फॉर्ममध्ये आहे. यंदाच्या हंगामात राजस्थान संघाने दहापैकी पाच सामने जिंकले आहेत. तर हैदराबाद संघाला नऊ पैकी फक्त तीन सामने जिंकला आले आहेत.
IPL 2023, RR vs SRH : राजस्थान विरुद्ध हैदराबाद
मागील सामन्यात राजस्थान संघाचा गुजरात टायटन्सने पराभव केला. तर, हैदराबाद संघाला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान संघाला प्लेऑफमध्ये जाण्याची आशा जिवंत ठेवण्यासाठी आज विजयी मार्गांवर परतण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, हैदराबाद संघाने त्यांच्या मागील सामन्यात विजय मिळवल्याने संघ नव्या उत्साहाने आजच्या सामन्यात उतरेल.
Rajasthani thaali before the action tomorrow 🧡🩷 pic.twitter.com/hQkcRsKIG8
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 6, 2023
Sawai Mansingh Stadium Pitch Report : सवाई मानसिंग स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
जपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमची खेळपट्टी चांगली फलंदाजांसाठी फायदेशीर आहे. तसेच फिरकीपटूंनाही या मैदानाच्या खेळपट्टीची मदत होऊ शकते. आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यांमधील मागील काही सामने आणि निकालांचा विचार करता नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा विचार करेल.
Off to Jaipur this Fireday ⏩
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 5, 2023
Time to get back on track 💪 pic.twitter.com/dalksreYOS
RR vs SRH Playing 11 : दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11
SRH Playing 11 : हैदराबादची संभाव्य प्लेईंग 11
अभिषेक शर्मा, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हॅरी ब्रूक, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, अकेल होसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक
RR Playing 11 : राजस्थानची संभाव्य प्लेईंग 11
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.