RR vs SRH Match Preview : हैदराबाद पराभवाचा वचपा काढणार की राजस्थान पुन्हा बाजी मारणार? पाहा हेड टू हेड आकडेवारी
SRH vs RR IPL 2023 Match 52 Prediction : आयपीएल 2023 मध्ये आज राजस्थान रॉयल्स (RR) सनरायझर्स हैदराबाद (SRH) या दोन संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे.
RR vs SRH Match Preview : आज जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) 52 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (RR) सनरायझर्स हैदराबाद (SRH) हे दोन संघ एकमेकांविरोधात उतरणार आहे. सध्या आयपीएल गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स संघ चौथ्या स्थानावर आहेत. राजस्थान संघाने आतापर्यंत दहा पैकी पाच सामने जिंकले आहेत. पण राजस्थान सलग दोन सामन्यांतील पराभवानंतर आज विजयासाठी मैदानात उतरणार आहे. मागील सामन्यात राजस्थानचा (Rajasthan Royals) गुजरात टायटन्सने दारुण पराभव केला.
SRH vs RR IPL 2023 : हैदराबाद आणि राजस्थान आमने-सामने
आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये (IPL 2023 Points Table) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) शेवटच्या दहाव्या स्थानावर आहेत. हैदराबाद संघाने यंदाच्या मोसमातल नऊ पैकी तीन सामने जिंकले आहेत. हैदराबाद संघाला मागील पाच सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकण्यात यश आलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या मागील सामन्यात हैदराबादला पाच धावांनी पराभव पत्करावा लागला.
RR vs SRH Head to Head : राजस्थान विरुद्ध हैदराबाद हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद एकूण 17 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाने आठ सामने जिंकले आहेत, तर राजस्थान रॉयल्स संघाने नऊ सामने जिंकले आहेत. आयपीएल 2023 मध्ये या दोन संघांमध्ये सामना झाला असून यामध्ये राजस्थानने हैदराबादचा 72 धावांनी पराभव केला. पराभवाचा वचपा काढण्याची संधी आज हैदराबाद संघाला मिळणार आहे.
☀️Good morning. Big game today! 🔥 pic.twitter.com/ZJjthVYLIt
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 7, 2023
IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
लखनौ (LSG) आणि गुजरात (GT) यांच्यात आज 7 मे रोजी सामना रंगणार आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.