RR vs RCB IPL 2024 :विराटच्या शतकाला बटलरच्या शतकानं उत्तर, आरसीबीला पराभवाचा धक्का, राजस्थान टॉपवर
IPL 2024 RR vs RCB live score updates : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये आज आमनासामना होणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर ही लढत होणार आहे.
LIVE
Background
IPL 2024 RR vs RCB live score updates : जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर आज रॉयल (RR vs RCB) लढत होणार आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals ) आणि फाफच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) यांच्यामध्ये आज काटें की टक्कर होईल. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
राजस्थानचा सलग चौथा विजय
विराटच्या शतकाला बटलरनं शतकानं उत्तर दिलं आहे.राजस्थान रॉयल्सकडून बटलरनं 100 धावा केल्या. यामुळं आरसीबीला पराभवाचा धक्का बसला. राजस्थान गुणतालिकेत आता पहिल्या स्थानावर पोहोचलं आहे.
राजस्थान रॉयल्सला दुसरा धक्का, संजू सॅमसन 69 धावांवर बाद
राजस्थान रॉयल्सला दुसरा धक्का बसला असून संजू सॅमसन 69 धावांवर बाद झाला आहे.
संजू सॅमसनचं अर्धशतक , आरसीबी बॅकफूटवर
संजू सॅमसननं अर्धशतक केलं असून यामुळं आरसीबी बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे.
जोस बटलरचं अर्धशतक
जोस बटलरचं अर्धशतक
FIFTY FOR JOS BUTTLER...!!!
— Johns. (@CricCrazyJohns) April 6, 2024
- A special knock by Buttler, fifty from just 30 balls in the run chase, game on at Jaipur. 👌 pic.twitter.com/cM3aA9SWXu
राजस्थाननं गियर बदलला, 7 ओव्हरमध्ये एका विकेटवर 63 धावा
राजस्थाननं गियर बदलला असून 7 ओव्हरमध्ये एका विकेटवर 63 धावा केल्या आहेत.