Avinash Jadhav Misal Pav : मतदानानंतर निवांत,अविनाश जाधवांनी लुटला मामलेदार मिसळीचा आस्वाद...
Avinash Jadhav Misal Pav : मतदानानंतर निवांत,अविनाश जाधवांनी लुटला मामलेदार मिसळीचा आस्वाद...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) मतदारांनी 30 वर्षांचा मतदानाचा विक्रम मोडीत काढताना भरभरून मतदान केलं आहे. 2024 च्या सर्वात लक्षवेधी आणि राजकारणाची खिचडी झाली असतानाच 65.1 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) जो जोरदार प्रचार करण्यात आला त्याचा परिणाम मतदानावरही दिसून आल्याचे मानले जात आहे. दोन्ही पक्षांचे मतदार घराबाहेर पडल्याचे दिसून येत आहे. राज्यातील मतदानाचा उच्चांक कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur) झाला असून 76 टक्के मतदान झालं आहे. राज्यातील सर्वाधिक मतदान करवीर विधानसभा मतदारसंघात 84.79 टक्के मतदान झालं आहे.
तब्बल 30 वर्षांनी राज्यात मतदानाचा आकडा वाढला
2024 च्या विधानसभा निवडणुकीत बंपर मतदानामुळे राज्यातील 100 विधानसभा जागांवर निकराची लढत होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत (Loksbha Election) महाराष्ट्रातील (Maharashtra) मतदारांनीही उत्साहाने मतदान केले होते. याचा फायदा महाविकास आघाडीला झाला होता. त्यामुळे तब्बल 30 वर्षांनी राज्यात मतदानाचा आकडा वाढला आहे. यापूर्वी 1995 मध्ये राज्यात विक्रमी 71.69 टक्के मतदान झाले होते. तेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदाच बिगर-काँग्रेस शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले होते. मात्र, महाराष्ट्रात यावेळी कोणाचे सरकार स्थापन होणार याचा निर्णय 23 नोव्हेंबरला होणार आहे.