TATA IPL 2022: थेट स्विमिंग पूलमध्ये डाईव्ह मारून धवननं पकडला जबरदस्त झेल, व्हिडिओ व्हायरल
TATA IPL 2022: आयपीएलच्या पंधरावा हंगाम शिखर धवनसाठी चांगला ठरत आहे. या हंगामात त्यानं आतापर्यंत चांगली फलंदाजी करून पंजाब किंग्जच्या विजयात मोठं योगदान दिलं आहे.
TATA IPL 2022: आयपीएलच्या पंधरावा हंगाम शिखर धवनसाठी (Shikhar Dhawan) चांगला ठरत आहे. या हंगामात त्यानं आतापर्यंत चांगली फलंदाजी करून पंजाब किंग्जच्या (Panjab Kings) विजयात मोठं योगदान दिलं आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत पंजाब किंग्ज चौथ्या क्रमांकावर आहे. पंजाबनं आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात विजय मिळवून दोन सामने गमावले आहेत. याचदरम्यान, शिखर धवनचा एक लक्ष वेधून घेणार व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओ शिखर धवननं थेट स्विमिंग पूलमध्ये डाईव्ह मारून जबरदस्त झेल पकडला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
शिखर धवननं त्याच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत शिखर धवन आणि जॉन्टी रोड्स स्विमिंग पूलमध्ये डाईव्ह मारून झेल पकडताना दिसत आहेत. या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. धवनच्या या व्हिडिओला ट्विटरवर जवळपास 2 हजार लोकांनी लाईक्स केले आहे. तर अनेकजण यावर प्रतिक्रिया देत आहेत.
व्हिडिओ-
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात शिखर धवनची आतापर्यंतची कामगिरी
या हंगामात शिखर धवननं पाच सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं एकूण 197 धावा केल्या आहेत. आयपीएल 2022 मध्ये त्यानं 19 चौकार आणि सहा षटकार मारले आहेत. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात धवनने चमकदार कामगिरी केली होती. त्यानं 50 चेंडूत 70 धावा केल्या. यादरम्यान त्यानं 5 चौकार आणि 3 षटकारही मारले. या सामन्यात त्याच्यासोबत मैदानात असताना मयंक अग्रवालने 52 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती.
हे देखील वाचा-