एक्स्प्लोर

Hardik Pandya: हार्दिकनं राजस्थानच्या गोलंदाजांचं कंबरडं मोडलं, रचले अनेक विक्रम

Hardik Pandya: गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (Gujarat Titans Vs Rajasthan Royals) यांच्यात आयपीएलच्या पंधराव्या हंगामात 24 वा सामना खेळण्यात आला.

Hardik Pandya: गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (Gujarat Titans Vs Rajasthan Royals) यांच्यात आयपीएलच्या पंधराव्या हंगामात 24 वा सामना खेळण्यात आला. या सामन्यात गुजरात टायटन्सनं 37 धावांनी विजय मिळवलाय. गुजरात टायटन्सच्या विजयात कर्णधार हार्दिक पांड्यानं महत्वाची भूमिका बजावली. हार्दिकनं नाबाद 87 धावांची तुफानी खेळी करत गुजरात टायटन्सच्या विजयाचा पाया रचला. या कामगिरीसह हार्दिक पांड्यानं अनेक विक्रमाला गवसणी घातली आहे. 

दरम्यान, राजस्थानविरुद्ध नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या गुजरातच्या संघाची सुरुवात खराब झाली. सामन्याच्या सुरुवातीलाच गुजरातनं महत्वाचे विकेट गमावले. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या हार्दिक पांड्यानं वादळी खेळी केली. ज्यामुळं गुजरातच्या संघाला राजस्थानसमोर मोठं लक्ष्य ठेवता आलं. हार्दिकनं 52 चेंडूंत आठ चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 87 धावांची खेळी केली. या खेळीसह हार्दिकनं आयपीएलमध्ये अनेक विक्रम केले आहेत. 

हार्दिकची चमकदार कामगिरी
- या हंगामात हार्दिक पांड्यानं पाच सामन्यात 228 धावा केल्या आहेत. आयपीएल 2022 मध्ये त्यानं कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा केल्या आहेत. 
- आयपीएल कारकिर्दीत पहिल्यांदाच हार्दिक पांड्याने सलग दोन सामन्यात अर्धशतके झळकावली आहेत. 
- हार्दिक पांड्याने मागील सामन्यात  आयपीएलमध्ये सर्वात जलद 100 षटकार ठोकणारा भारतीय खेळाडू होण्याचा मान पटकावला.

गुजरातची गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप
आयपीएल 2022 च्या 24 व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या गुजरातनं 20 षटकांत चार विकेट्स गमावून राजस्थान रॉयल्ससमोर 193 धावांचं लक्ष्य ठेवलं. संघाच्या वतीनं कर्णधार हार्दिक आणि अभिनव मनोहर यांच्यात 55 चेंडूत 86 धावांची शानदार भागीदारी केली. राजस्थानला पराभूत करून गुजरातच्या संघानं गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेत आहेत. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Embed widget