Rajat Patidar IPL 2025 : बंगळुरूच्या नवीन कर्णधाराचा मोठा पराक्रम, मोडित काढला महान सचिन तेंडुलकरचा विक्रम अन्...
आरसीबी संघाला पंजाब किंग्जविरुद्ध 5 विकेटने पराभव पत्करावा लागला.

Rajat Patidar breaks Sachin Tendulkar Record : आरसीबी संघाला पंजाब किंग्जविरुद्ध 5 विकेटने पराभव पत्करावा लागला. या सामन्यात आरसीबीचे गोलंदाज आणि फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत. यामुळे संघाला घरच्या मैदानावर दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने 18 चेंडूत 23 धावा केल्या, ज्यात एक चौकार आणि एक षटकार होता. यासह त्याने आयपीएलमध्ये आपले 1000 धावा पूर्ण केले.
मोडित काढला महान सचिन तेंडुलकरचा जुना विक्रम अन्...
रजत पाटीदार आयपीएलमध्ये सर्वात कमी डावांमध्ये 1000 धावा पूर्ण करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने हे फक्त 30 आयपीएल डावांमध्ये केले आहे. तर महान सचिन तेंडुलकरने 31 डावांमध्ये 1000 आयपीएल धावा पूर्ण केल्या. आता पाटीदारने आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 1000 धावा करण्याच्या बाबतीत महान सचिनला मागे टाकले आहे. आयपीएलमध्ये सर्वात जलद हजार धावा करणारा भारतीय फलंदाज साई सुदर्शन आहे. त्याने हे फक्त 25 डावांमध्ये केले.
रजत पाटीदार 2021 पासून आयपीएलमध्ये सहभागी आहे. आतापर्यंत तो सर्व हंगाम फक्त आरसीबी संघासाठी खेळला आहे. पाटीदारने आतापर्यंत 34 आयपीएल सामन्यांमध्ये एकूण 1008 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एक शतक आणि 9 अर्धशतके त्याच्या बॅटमधून आली आहेत.
Rajat Patidar becomes the second fastest Indian to complete 1,000 IPL runs.
— All Cricket Records (@Cric_records45) April 18, 2025
Fastest to 1,000 IPL runs by Indians:
25 innings – Sai Sudharsan
30 innings – Rajat Patidar*
31 innings – Ruturaj Gaikwad
31 innings – Sachin Tendulkar
33 innings – Tilak Varma
The overall record is… pic.twitter.com/LPQDWslTKe
IPL मध्ये सर्वात वेगवान 1000 धावा करणारे भारतीय फलंदाज
साई सुदर्शन- 25 डाव- 2024
रजत पाटीदार- 30 डाव- 2025
सचिन तेंडुलकर- 31 डाव- 2010
ऋतुराज गायकवाड- 31 डाव- 2022
तिलक वर्मा- 33 डाव- 2019
आरसीबी संघ पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर
रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली, आयपीएलच्या चालू हंगामात आरसीबीची कामगिरी खूपच चढ-उताराची राहिली आहे. संघाने आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत, त्यापैकी 4 जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत. 8 गुणांसह त्याचा नेट रन रेट अधिक 0.446 आहे. तो चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने तीन सामने गमावले आहेत आणि ते पण त्याच्या घरच्या मैदानावर हरला आहे. चालू हंगामात, आरसीबी हा एकमेव संघ आहे ज्याने अद्याप त्यांच्या घरच्या मैदानावर एकही सामना जिंकलेला नाही.
हे ही वाचा -





















