एक्स्प्लोर

चिन्नास्वामीवर पंजाब किंग्सने विराट कोहलीच्या आरसीबीची काढली लाज! घरच्या मैदानावर बंगळुरूची पराभवाची हॅटट्रिक, पॉइंट टेबलमध्येही घसरण

विजयाची मालिका सुरू ठेवत, पंजाब किंग्जने आयपीएल 2025 मध्ये आपला पाचवा विजय नोंदवला आहे.

Punjab Kings vs Royal Challengers Bangalore : विजयाची मालिका सुरू ठेवत, पंजाब किंग्जने आयपीएल 2025 मध्ये आपला पाचवा विजय नोंदवला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाने एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 5 गडी राखून पराभव केला. पावसामुळे प्रभावित झालेला हा सामना फक्त 14 षटकांचा करण्यात आला, ज्यामध्ये बंगळुरू संघाचे स्टार फलंदाज पुन्हा एकदा त्यांच्या घरच्या मैदानावर अपयशी ठरले आणि त्यांना फक्त 95 धावा करता आल्या. प्रत्युत्तर पंजाबने सावध फलंदाजी केली आणि हे लक्ष्य 11 षटकांत पूर्ण केले. युजवेंद्र चहल आणि नेहल वढेरा हे पंजाबच्या विजयाचे हिरो ठरले.

अर्शदीप सिंग अन् युजवेंद्र चहलने आरसीबीला गंडवले

आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यातील रोमांचक सामना पावसामुळे व्यत्यय आला, ज्यामुळे नाणेफेक नियोजित वेळेवर झाले नाही. सामना सुमारे 2 तास 15 मिनिटे उशिराने सुरू झाला. या कारणास्तव, सामना 20 षटकांऐवजी 14 षटकांचा खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना, आरसीबीची सुरुवात खराब झाली, कारण त्यांचा अर्धा संघ 33 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. आरसीबीचा कोणताही फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही आणि संघाच्या विकेट नियमित अंतराने पडत राहिल्या. टिम डेव्हिड वगळता फक्त कर्णधार रजत पाटीदारलाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. पाटीदार 18 चेंडूत एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 23 धावा काढून बाद झाला. 

संघाने 63 धावांवर 9 विकेट गमावल्या होत्या. तेथून टिम डेव्हिडने 26 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 50 धावा काढल्या, त्यामुळे संघाचा स्कोअर 95 पर्यंत पोहोचला. टिमने 14 व्या षटकात सलग 3 षटकार मारले. पंजाब किंग्जच्या वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजीसमोर आरसीबीच्या फलंदाजांनी गुडघे टेकले .  अर्शदीप सिंगने 3 षटकांत 23 धावा देत 2 बळी घेतले, मार्को जानसेनने 3 षटकांत 10 धावा देत 2 बळी घेतले, चहलने 3 षटकांत 11 धावा देत 2 बळी घेतले आणि हरप्रीत ब्रारने 2 षटकांत 25 धावा देत 2 बळी घेतले तर झेवियर बार्टलेटला एक विकेट मिळाली.  

नेहल वढेरा नडला अन् जिंकला... 

प्रभसिमरन सिंग (13) आणि प्रियांश आर्य (16) हे देखील पंजाब किंग्जसाठी चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरले, कारण ते चार षटकांतच आऊट झाले. पण, पंजाबची सुरुवात बंगळुरूपेक्षा अजूनही वेगवान होती आणि संघाने 7 षटकांत 50 धावा पूर्ण केल्या. पण आठव्या षटकात, जोश हेझलवूड (3/14) ने श्रेयस अय्यर (7) आणि जोश इंग्लिस (14) यांना आऊट करून बंगळुरूला पुन्हा सामन्यात आणले. तिथून सामना कठीण दिसत होता, पण नेहल वधेरा (33 धावा, 19 चेंडू) ने सुयश शर्माच्या सलग 2 षटकांत 2 षटकार आणि 2 चौकार मारून संघाचा खेळ सोपा केला. अखेर पंजाबने हे लक्ष्य 12.1 षटकांत पूर्ण केले.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PBKS vs RCB IPL 2026 : प्लेऑफचं पहिली तिकीट बंगळुरूला! तर पंजाबच्या आशांवर बुलडोझर, पराभवाच्या षटकारानं श्रेयसच्या टीमचं टॉप-4चं समीकरण बिघडलं
प्लेऑफचं पहिली तिकीट बंगळुरूला! तर पंजाबच्या आशांवर बुलडोझर, पराभवाच्या षटकारानं श्रेयसच्या टीमचं टॉप-4चं समीकरण बिघडलं
PBKS vs RCB LIVE Score : धरमशाळेत आरसीबीची 'राॅयल' विजय; शशांकची झुंज व्यर्थ, पंजाबचा 23 धावांनी गेम ओव्हर
PBKS vs RCB LIVE Update : धरमशाळेत आरसीबीची 'राॅयल' विजय; शशांकची झुंज व्यर्थ, पंजाबचा 23 धावांनी गेम ओव्हर
DC vs RR LIVE Score IPL 2026 : हारला तर संपला! दिल्लीने जिंकला टॉस, राजस्थान रॉयल्सला दिले फलंदाजीचे आमंत्रण
DC vs RR LIVE Update : हारला तर संपला! दिल्लीने जिंकला टॉस, राजस्थान रॉयल्सला दिले फलंदाजीचे आमंत्रण
IPLचं वेळापत्रक बदलणार, प्रेक्षकांना नो एन्ट्री, सरकार घेणार अंतिम निर्णय; मोठ्या संकटावेळी BCCI काय करणार?
IPLचं वेळापत्रक बदलणार, प्रेक्षकांना नो एन्ट्री, सरकार घेणार अंतिम निर्णय; मोठ्या संकटावेळी BCCI काय करणार?

व्हिडीओ

Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
Bachchu Kadu on Eknath Shinde : अवघ्या महाराष्ट्राला शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता
Pune MNS Morcha Against Fuel Price Hike : इंधन दरवाढीविरोधात मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा | ABP Majha
Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
Petrol Diesel : रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
'शक्तिपीठ माढा तालुक्यातून पालखी व पुणे-सोलापूर महामार्गाला समांतर, एक इंचही जमीन देणार नाही'; राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
'शक्तिपीठ माढा तालुक्यातून पालखी व पुणे-सोलापूर महामार्गाला समांतर, एक इंचही जमीन देणार नाही'; राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
Devendra Fadnavis : जेवढं मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथ शिंदेंनी मराठा समाजासाठी केलं, ते महाराष्ट्रातील इतर सरकारांकडून झालं असं वाटत नाही : देवेंद्र फडणवीस
कर्जमाफी, पार्थ पवारांची भेट ते मनोज जरांगेंचं आंदोलन, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात; हायवाच्या ट्रकच्या भीषण धडकेत 1 ठार, 5 जखमी
अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात; हायवाच्या ट्रकच्या भीषण धडकेत 1 ठार, 5 जखमी
व्हेनेझुएला, इराणनंतर आता आणखी एका देशाकडे अमेरिकेनं मोर्चा वळवला; सरकारने देशातील नागरिकांना गनिमी काव्याचे धडे देण्यास सुुरुवात केली
व्हेनेझुएला, इराणनंतर आता आणखी एका देशाकडे अमेरिकेनं मोर्चा वळवला; सरकारने देशातील नागरिकांना गनिमी काव्याचे धडे देण्यास सुुरुवात केली
पेट्रोल 120 ते 130 रुपयांवर जाईल, जयंत पाटलांनी सांगितलं कधी महागणार; देवेंद्र फडणवीसांवरही टीका
पेट्रोल 120 ते 130 रुपयांवर जाईल, जयंत पाटलांनी सांगितलं कधी महागणार; देवेंद्र फडणवीसांवरही टीका
Embed widget