RR vs CSK : राजस्थानने रचला इतिहास, 15 वर्षांनंतर चेन्नईला घरच्या मैदानावर मात; चेपॉक स्टेडिअमवर रंगला जंगी सामना
IPL 2023 : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) तीन धावांनी पराभव केला.
Rajasthan Royals Win In Chepauk vs CSK : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) 17 वा सामना राजस्थान (Rajsthan Royals) आणि चेन्नई (Chennai Super Kings) यांच्यात पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचक ठरलेल्या या सामन्यात अखेर राजस्थानने विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सने अवघ्या तीन धावांनी चेन्नई संघांकडून विजय हिसकावत सामना स्वत:च्या खिशात घातला. विशेष म्हणजे चेन्नईच्या घरच्या मैदानावर राजस्थानने चेन्नईवर रॉयल विजय मिळवत त्यांचा 15 वर्ष जुना विक्रम मोडला आहे. चेन्नई सुपर किंग्सचं होमग्राऊंड एमए चिदंबरम स्टेडियम म्हणजेच चेपॉक स्टेडिअमवर राजस्थानने चेन्नईचा पराभव केला. चेपॉक स्टेडिअम चेन्नई संघाचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र या मैदानावर राजस्थानने दशकाहून अधिक कालावधीनंतर पहिल्यांदा चेन्नईला मात दिली आहे.
राजस्थानने रचला इतिहास, 15 वर्षांनंतर चेन्नईला घरच्या मैदानावर मात
एमए चिदंबरम स्टेडियम म्हणजेच चेपॉक स्टेडिअम चेन्नईचा बालेकिल्ला असल्यामुळे या मैदानावर त्यांचा पराभव करणे हे विरोधी संघासमोर आव्हान असतं. पण राजस्थानने 12 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात चेन्नईचा त्यांच्याच बालेकिल्ला असलेल्या चेपॉक स्टेडिअमवर पराभव केला. 15 वर्षानंतर राजस्थानने चेपॉकवर चेन्नईला मात दिली आहे. आयपीएलच्या इतिहासात या आधी आयपीएल 2005 साली राजस्थानने चेपॉक स्टेडिअमवर विजय मिळवला होता. त्यानंतर मागील 15 वर्षामध्ये राजस्थानला ही कामगिरी करता आली नव्हती. आता आयपीएल 2023 मध्ये राजस्थानने चेन्नईचा पराभव केला.
राजस्थानचा चेपॉकमध्ये आणखी एक विक्रम
राजस्थानने घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) पराभव करून आणखी एक मोठा विक्रम नोंदवला आहे. गेल्या 10 वर्षात चेपॉक स्टेडिअमवर (CSK) पराभूत करणारा राजस्थान रॉयल्स (RR) हा दुसरा संघ ठरला आहे. या गेल्या 10 वर्षात फक्त मुंबई इंडियन्स संघाने चेपॉकवर चेन्नईला मात दिली आहे. मुंबई इतर कोणत्याही संघाला गेल्या 10 हंगामात चेपॉकवर चेन्नई विरुद्धचा सामना जिंकता आलेला नाही.
रोमांचक सामन्यात राजस्थानचा चेन्नईवर विजय
इंडियन प्रीमियर लीग 2023 चा 17 वा सामना 12 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. चेपॉक स्टेडिअमवर झालेल्या या रोमहर्षक सामन्यात राजस्थानने चेन्नईचा 3 धावांनी पराभव केला. अखेरच्या षटकात चेन्नईला सामना जिंकण्यासाठी 21 धावांची गरज होती. मात्र अखेरच्या षटकात चेन्नईला केवळ 17 धावा करता आल्या. प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या नेतृत्त्वात राजस्थान संघाने 8 बाद 175 धावा केल्या. विजयासाठी 176 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी धोनीच्या नेतृत्त्वात संघाला 20 षटकांत 6 गडी गमावून 172 धावा करता आल्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :