IPL 2023 : काळजाचा ठोका चुकवणारा 'तो' क्षण! धोनी मैदानावर आल्यावर करोडो चाहत्यांनी रोखला श्वास, रेकॉर्डब्रेक प्रेक्षकांची नोंद
RR vs CSK Viewers Record : राजस्थानविरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात 21 धावांची गरज होती, मात्र त्यांना केवळ 17 धावा करता आल्या.
CSK vs RR, Match 17, Last Over : इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील गेल्या काही सामन्यांमध्ये शेवटच्या षटकांचा थरार सातत्यानं आणि एका वेगळ्याच पातळीवर पाहायला मिळत आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) मधील चेन्नई (CSK) आणि राजस्थान (RR) यांच्यात बुधवारी झालेल्या सामन्यात असंच काहीसं घडलं. चेन्नई आणि राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यात शेवटच्या षटकावेळी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. या सामन्याच्या शेवटच्या षटकात चेन्नई संघाला विजयासाठी 21 धावांची गरज होती, त्यापैकी धोनीने (Dhoni) 2 चेंडूत सलग 2 षटकार मारून सामना अतिशय रोमांचक बनवला. त्यानंतर राजस्थान संघाने हा सामना तीन धावांनी जिंकला, पण धोनीने पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांच्या ठोके वाढवले होते, हे मात्र नक्की.
काळजाचा ठोका चुकवणारा 'तो' क्षण!
राजस्थानने दिलेल्या 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना धोनी 17 चेंडूत 32 धावा आणि रविंद्र जडेजाने 15 चेंडूत 25 धावा केला. धोनी आणि जडेजाने शेवटच्या षटकात चित्तथरारक कामगिरी केली. चेन्नईला अखेरच्या षटकात 21 धावांची गरज होती. धोनी आणि जडेजाने शेवटच्या चेंडूपर्यंत आटोकाठ प्रयत्न करुन संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. धोनीने शेवटच्या षटकात सलग दोन षटकार ठोकल्यावर जणू पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. धोनी मैदानात खेळण्यासाठी उतरल्यावर करोडो प्रेक्षकांनी श्वास रोखून धरल होता. धोनीला खेळ पाहण्यासाठी 2.2 कोटी क्रिकेट चाहते ऑनलाईन हा सामना जिओ सिनेमावर पाहत होते.
धोनीला पाहण्यासाठी 2.2 कोटी प्रेक्षक ऑनलाईन
For one moment, 2.2 Cr Indians held their breath. Old memories rushed back. A familiar expectation took over.
— JioCinema (@JioCinema) April 12, 2023
It didn't quite end like it used to but for one moment, time stood still for 20 million+ people.
One moment. One MS Dhoni. #IPLonJioCinema #TATAIPL #IPL2023 #CSKvRR pic.twitter.com/joo2Qm24Ve
धोनी मैदानावर आल्यावर करोडो चाहत्यांनी रोखला श्वास
चेन्नई संघाला विजय मिळवून देण्याची शेवटची संधी धोनीकडे होती. त्यामुळे त्याच्याकडे करोडो चाहत्यांच्या नजरा लागल्या होत्या. जिओ सिनेमा ॲपवर 2.2 करोड चाहते धोनीचा खेळ लाईव्ह स्ट्रिमिंगवर पाहत होते. रोमांचक असा हा सामना राजस्थानने जिंकला. पण, धोनीचा खेळ काळजाचा ठोका चुकवणारा होता. सलग दोन षटकार ठोकल्यामुळे चाहत्यांची अपेक्षा बळावली होती. शेवटच्या षटकातील हा क्षण 20 दशलक्षहून अधिक लोक लाईव्ह पाहत होते.
CSK vs RR : राजस्थान रॉयल्सचा चेन्नईवर विजय
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात राजस्थानने चेन्नईचा रॉयल पराभव केला. अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी 21 धावांची गरज होती. मैदानावर जगातील सर्वात मोठा फिनिशर धोनी आणि अष्टपैलू जाडेजा होते. धोनीने संदीप शर्माच्या षटकात दोन षटकार मारत सामना रंजक वळणावर आणला. पहिल्या तीन चेंडूवर सामना चेन्नईच्या बाजूने झुकला होता. पण संदीप शर्मा याने अखेरच्या तीन चेंडूवर सामना राजस्थानच्या बाजूने झुकवला. संदीप शर्मा याने यॉर्कर चेंडू फेकत धोनी आणि जाडेजा यांची बॅट शांत ठेवली. राजस्थानने दिलेल्या 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ 172 धावांपर्यंत मजल मारु शकला. धोनी आणि जडेजा यांनी अखेरपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. पण संदीप शर्माच्या भेदक माऱ्यापुढे त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. धोनीने या सामन्यात 17 चेंडूत 32 धावांची विस्फोटक खेळी केली. तर जाडेजाने 15 चेंडूत 25 धावांची खेळी केली. धोनी आणि जाडेजा यांनी 30 चेंडूत नाबाद 59 धावांची भागिदारी केली. पण या दोन्ही अनुभवी फलंदाजांना चेन्नईला विजय मिळवून देण्यात अपयश आले.