(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 Points Table : चेन्नईवर राजस्थानचा विजय, गुणतालिकेत बदल; ऑरेंज-पर्पल कॅपच्या शर्यतीत कोण पुढे?
IPL Points Table : राजस्थान रॉयल्सने शेवटच्या षटकात चेन्नई सुपर किंग्सचा तीन धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये बदल झाला आहे. गुणतालिकेतील सध्याची स्थिती जाणून घ्या.
IPL 2023 Points Table : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) 17 वा सामना राजस्थान (Rajsthan Royals) आणि चेन्नई (Chennai Super Kings) यांच्यात पार पडला. बुधवारी झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या (CSK) विजयानंतर राजस्थान रॉयल्स संघाने (RR) गुणतालिकेत पहिलं स्थान पटकावलं आहे. तर, लखनौ सुपर जायंट्स (LSG) पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचक ठरलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सचा तीन धावांनी पराभव केला. चेन्नई सुपर किंग्सला राजस्थाननं 176 धावांचं लक्ष्य दिलं होतं, मात्र कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या संघाला 20 षटकांत 6 गडी गमावत 172 धावाच करता आल्या. महेंद्र सिंग धोनी आणि रविंद्र जडेजाने संघाला विजय मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण, अखेर राजस्थान रॉयल्सने तीन धावांनी सामना जिंकला. चेन्नई सुपर किंग्सच्या पराभवानंतर राजस्थान रॉयल्स संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर राजस्थान संघाकडे 6 गुण झाले असून, संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. राजस्थान संघाने आतापर्यंत 4 सामने खेळले असून त्यापैकी 3 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, सामना गमावल्यानंतर चेन्नई पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. चेन्नईकडे 2 सामन्यांमध्ये विजय आणि 2 सामन्यांमध्ये पराभवानंतर 4 गुण आहेत.
राजस्थान रॉयल्सच्या विजयानंतर लखनौ सुपर जायंट्सची गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघाकडे प्रत्येकी 6 गुण आहेत. पण चांगल्या नेट रनरेटमुळे राजस्थानचा संघ अव्वल आहे. तसेच, चेन्नई सुपर किंग्सचा संघ 4 सामन्यांत दोन विजय आणि दोन पराभवांसह गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स हे संघ गुणतालिकेत अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. तर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्स संघ सहाव्या क्रमांकावर आहे.
दिल्ली कॅपिटल्सला अद्याप पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत
कोलकाता नाईट रायडर्ससह (KKR) गुजरात टायटन्स (GT), चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि पंजाब किंग्सचे (PBKS) प्रत्येकी 4 गुण आहेत. त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स (MI) आठव्या क्रमांकावर आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) नवव्या क्रमांकावर आहे. तस, दिल्ली कॅपिटल्सचा (DC) संघ पॉइंट टेबलमध्ये सर्वात शेवटी म्हणजे दहाव्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाकडे प्रत्येकी 2 गुण आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघ यंदाच्या मोसमातील पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत.
ऑरेंज कॅप (Orange Cap)
या सामन्यानंतरही सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये म्हणजेच ऑरेंज कॅपच्या शर्यतीत शिखर धवन पहिल्या क्रमांकावर आहे. डेव्हिड वॉर्नर 209 धावांसाह दुसऱ्या क्रमांकावर आहे. जोस बटलरने चेन्नईविरुद्ध 52 धावांची खेळी केली, त्यानंतर तो ऑरेंज केपरच्या शर्यतीत 204 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- शिखर धवन : 225 धावा
- डेव्हिड वॉर्नर : 209 धावा
- जोस बटलर : 204 धावा
- ऋतुराज गायकवाड : 197 धावा
- फाफ डु प्लेसिस : 175 धावा
पर्पल कॅप (Purple Cap)
सर्वाधिक विकेट्स काढण्याच्या शर्यतीत म्हणजेच पर्पल कॅपच्या शर्यतीत राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल पहिला आला. त्याच्या नावावर चार सामन्यात 10 विकेट आहेत.
- युझवेंद्र चहल : 10 विकेट्स
- मार्क वुड : 9 विकेट्स
- राशिद खान : 8 विकेट्स
- तुषार देशपांडे : 7 विकेट्स
- रविचंद्रन अश्विन - 6 विकेट्स
महत्त्वाच्या इतर बातम्या :