IPL 2022 Auction : रैना-धोनी ते हार्दीक-पोलार्ड, या दमदार जोड्या आयपीएल 2022 मध्ये होणार वेगळ्या
IPL 2022 Auction: आयपीएलच्या लिलावात यंदा मोठे फेरबदल झाले असून 10 संघानी 204 खेळाडूंना लिलावात खरेदी केलं आहे.
IPL 2022 Auction : दोन दिवस सुरु असलेलं आयपीएल ऑक्शन 2022 अखेर पार पडलं. यावेळी 8 जागी 10 संघ स्पर्धेत असल्याने मोठी चुरस असणार आहे, त्यात नवे संघ आल्याने महालिलाव पार पडला. ज्यात अनेक बदल झाले असून मोठ्या फेरबदलांसह सर्वच संघ हटके दिसत आहेत. पण या फेरबदलात अनेक हीट जोड्या मात्र तुटल्या आहे. यात रैना-धोनी ते हार्दीक-पोलार्ड अशा जोड्यांचा समावेश असून या यादीवर एक नजर फिरवूया...
चेन्नई सुपर किंग्सचा माजी दिग्गज खेळीडू सुरेश रैना याला संघाने 2 कोटींच्या बेस प्राईसलाही विकत घेतले नाही. दुसरीकडे धोनीला 12 कोटींना संघाने विकत घेतलं पण आयपीएल गाजवलेल्या मिस्टर आयपीएल सुरेश रैनासाठी मात्र 2 कोटी रुपयेही खर्च करता आले नाहीत. त्यामुळे आयपीएलमधील ही धोनी-रैनाची हीट जोडी आता मैदानात एकत्र दिसणार नाही. यामुळे सीएसके चाहतेही नाराज असून त्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे आरसीबीचा स्टार खेळाडू एबी डिव्हीलीयर्सने यंदा लिलावात भागच घेतला नाही. त्यामुळे तो यंदा आरसीबी किंवा कोणत्याच संघात दिसणार नाही. त्यामुळे विराट कोहली आणि एबी डिव्हिलीयर्स ही जोडीही एकत्र दिसणार नाही. त्यासोबत आणखी एक धाकड जोडी म्हणजे मुंबई इंडियन्सचा हार्दिक पंड्या आणि कायरन पोलार्ड. या दोघांनी अनेक सामने गाजवले आहेत. पण हार्दीक यंदा गुजरात संघाचा कर्णधार झाला आहे. तर पोलार्ड मुंबईतच कायम असल्याने आता ही जोडी एकत्र मैदान गाजवताना दिसणार नाही. याशिवाय दिल्लीचे धाकड खेळाडू पृथ्वी-शिखर ही जोडी तर 2021 आयपीएलमध्येही कहर करत होती. पण धवन पंजाब संघात गेला आहे. तर पृथ्वी दिल्लीमध्ये कायम आहे. शिवाय पंजाबची हीट जोडी राहुल, मयांक हे देखील वेगळे झाले आहे. राहुल लखनौचा कर्णधार असून मयांक पंजाबमध्ये कायम आहे.
हे ही वाचा :
- IPL auction 2022 Unsold Players List : सुरेश रैना ते स्टीव्ह स्मिथ, 'या' खेळाडूंकडे फिरवली पाठ, पाहा संपूर्ण यादी
- IPL 2022 Mega Auction : लिलाव संपला, ईशान किशन ते आवेश खान, 11 जण मालामाल
- CSK Final Squad 2022 : रैनाकडे फिरवली पाठ, डुप्लेसीसलाही गमावलं, पाहा चेन्नईचे 25 ‘किंग्स’
LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा