CSK Final Squad 2022 : रैनाकडे फिरवली पाठ, डुप्लेसीसलाही गमावलं, पाहा चेन्नईचे 25 ‘किग्स’
IPL Auction 2022, CSK Full Teams : आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी बंगळुरुमध्ये दोन दिवसांचा लिलाव पार पडला. या लिलावात 10 फ्रेचायझींनी 204 खेळाडूंना खरेदी केलं.
IPL Auction 2022, CSK Full Teams : आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी बंगळुरुमध्ये दोन दिवसांचा लिलाव पार पडला. या लिलावात 10 फ्रेचायझींनी 204 खेळाडूंना खरेदी केलं. यासाठी 5,51,70,00,000 रुपये खर्च केले. दहा संघांनी 67 विदेशी खेळाडूंना तर 137 भारतीय खेळाडूंना खरेदी केलं आहे. एम.एस धोनीच्या चेन्नईने मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनाकडे पाठ फिरवली तर डुप्लेसीसला गमावले. दोन दिवसाच्या लिलावत चेन्नईने 21 खेळाडूंची खरेदी केली. यामध्ये रॉबिन उथाप्पा (2 कोटी), ड्वेन ब्राव्हो (4.40 कोटी), अंबाती रायुडू (6.75 कोटी), दीपक चहर (14 कोटी) यांना खरेदी केलं आहे.
चेन्नईने दीपक चहरला 14 कोटी रुपये मोजून पुन्हा एकदा आपल्या संघात घेतलं आहे. तसेच अष्टपैलू शिवम दुबेसाठी चार कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच अंडर 19 संघाताली राजवर्धन हंगरगेकर याला 1.50 कोटी रुपयात आपल्या संघात घेतलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने कर्णधार एमएस धोनी, अष्टपैलू रविंद्र जडेजा, मोईन अली आणि ऋतुराज गायकवाड यांना रिटेन केलं होतं.
असा आहे अंतिम चेन्नई सुपर किंग्सचा ताफा (25 खेळाडू) -
शिलेदार – रवींद्र जाडेजा (16 कोटी), महेंद्रसिंग धोनी (12 कोटी), मोईन अली (8 कोटी), ऋतुराज गायकवाड (6 कोटी), रॉबिन उथाप्पा (2 कोटी), ड्वेन ब्राव्हो (4.40 कोटी), अंबाती रायुडू (6.75 कोटी), दीपक चहर (14 कोटी), शिवम दुबे (4 कोटी), महिश तिक्षाना (70 लाख), सिमरनजीतसिंग (20 लाख), डेवॉन कॉनवे (1 कोटी), ड्वेन प्रिटोरियस (50 लाख), मिचेल सॅन्टनर (1.90 कोटी), अडम मिल्न (1.90 कोटी), केएम आसिफ (20 लाख), तुषार देशपांडे (20 लाख). शुभ्रांशु सेनापती (20 लाख), मुकेश चौधरी (20 लाख), प्रशांत सोळंकी (1.20 कोटी) ,ख्रिस जॉर्डन (3.60 कोटी), एन जगदीशन (20 लाख), सी. हरी निशांत(20 लाख), भगत वर्मा(20 लाख), राजवर्धन हंगरगेकर (1.50 कोटी)
All set to R🦁AR! #Prideof2022 #WhistlePodu 💛
— Chennai Super Kings - Mask P😷du Whistle P🥳du! (@ChennaiIPL) February 13, 2022