Priyansh Arya on IPL 2025 : 'मी RCBला IPL चॅम्पियन बनवणार...' 6 चेंडूत 6 षटकार ठोकणाऱ्या प्रियांश आर्यचे मोठे वक्तव्य
Priyansh Arya on IPL 2025 : प्रियांश आर्यने अलीकडेच दिल्ली प्रीमियर लीग टी-20 दरम्यान एका षटकात सहा षटकार चर्चत आला. या कामगिरीमुळे त्याला नव्या सिक्सर किंगचे नाव मिळाले.
Priyansh Arya on IPL 2025 : प्रियांश आर्यने अलीकडेच दिल्ली प्रीमियर लीग टी-20 दरम्यान एका षटकात सहा षटकार चर्चत आला. या कामगिरीमुळे त्याला नव्या सिक्सर किंगचे नाव मिळाले. त्यामुळे तो येत्या काही दिवसांत आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतो. प्रियांश आर्यने दिल्ली प्रीमियर लीगमध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
'या' संघाकडून खेळण्याची इच्छा
प्रियांश आर्यने स्पोर्ट्स यारीला दिलेल्या मुलाखतीत काही गोष्टी सांगितल्या. आर्यने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला की, मला आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळायला आवडेल, कारण विराट कोहली माझा आवडता क्रिकेटर आहे. आयपीएलच्या इतिहासात आजपर्यंत आरसीबीला ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्रथमच चॅम्पियन बनवण्यासाठी मी माझे 100 टक्के योगदान देईन.
विराट कोहली आदर्श
या मुलाखतीदरम्यान आर्याने सांगितले की, विराट कोहली माझे प्रेरणास्थान आहे. तो भारतासाठी सतत धावा करतो आणि त्याने मला खूप प्रेरणा दिली. त्यामुळे विराट कोहलीसोबत फलंदाजी करायची आहे.
एका षटकात सहा षटकार
एका षटकात सहा षटकार मारण्याच्या त्याच्या अविश्वसनीय पराक्रमाबद्दल आर्याला विचारले असता, आर्याने सांगितले की, पहिल्या तीन षटकारानंतर नाही तर चौथ्या षटकारानंतर मला वाटले की मी सहा षटकार मारू शकतो. आयुषने त्यावेळी असेही म्हटले होते की, पहिल्या चार चेंडूंवर चार षटकार मारण्यासाठी वेळ मिळणे कठीण आहे, त्यामुळे पुढे जात राहा आणि सहा षटकार मारण्याचा प्रयत्न करा.
प्रियांश आर्यवर होणार पैशांचा वर्षाव?
प्रियांश आर्यच्या दमदार फलंदाजीची चाहत्यांमध्ये सतत चर्चा होत असते. आयपीएल मेगा लिलावादरम्यान प्रियांश आर्यला मोठी रक्कम देऊन विकत घेतले जाऊ शकते, असे मानले जात आहे. आयपीएल 2025 मध्ये प्रियांश आर्यला खरेदी करण्यात अनेक संघ रस दाखवू शकतात. अनेक फ्रँचायझींना सलामीवीर फलंदाजांची गरज आहे.
दिल्ली प्रीमियर लीगमध्ये आयुष बडोनी आणि प्रियांश ओर्या यांच्या शतकी खेळीमुळे दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सने 20 षटकात 5 विकेट गमावत 308 धावा केल्या. प्रियांश ओर्याने 50 चेंडूत शतकाचा टप्पा पार केला. तसेच त्याच्या इनिंगमध्ये सलग 6 षटकार मारले. प्रियांश आर्यशिवाय आयुष बडोनीने 55 चेंडूत 165 धावांची विक्रमी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 19 षटकार आणि 8 चौकार लगावले.