IPL 2022 : पंजाबविरोधातील पराभवानंतर आरसीबीचा कर्णधार नाराज, सांगितले पराभवाचं कारण
PBKS vs RCB, IPL 2022 : पंजाब किंग्सविरोधात (Punjab Kings) झालेल्या पराभवामुळे आरसीबीचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार फाफ डु प्लेसिस नाराज आहे.
PBKS vs RCB, IPL 2022 : पंजाब किंग्सविरोधात (Punjab Kings) झालेल्या पराभवामुळे आरसीबीचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार फाफ डु प्लेसिस नाराज आहे. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 205 धावांचा डोंगर उभा केला होता. पंजाब संघाने दमदार फलंदाजी करत हे आव्हान सहज पार केले. 200 पार धावसंख्या उभारल्यानंतरही पराभव स्वीकारावा लागल्यामुळे फाफ डु प्लेसिस नाराज झाला. रविवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्स (Punjab Kings) विरोधात आरसीबीला पाच विकेटनं पराभवा स्विकारावा लागला. या पराभवानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने सामन्यात नेमकी चूक कुठे झाली, याचा उलगडा केला आहे. फाफ डु प्लेसिस म्हणाला की, ओडियन स्मिथ (Odean Smith) चा झेल सोडणं आम्हाला महागत पडले. सामनावीर पुरस्कार मिळालेल्या स्मिथने 8 चेंडूत नाबाद 25 धावांची खेळी केली. पंजाबने 206 धावांचा पाठलाग 19 व्या षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात पार केले.
206 धावांचा पाठलगा करणाऱ्या पंजाबच्या स्मिथचा 17 व्या षटकात झेल सुटला. हाच सामन्याचा टर्निंग पॉईंट असल्याचे आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने सांगितले. 17वे षटक टाकण्यासाठी हर्षल पटेल आला होता. या षटकात स्मिथने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू अनुज रावतच्या हातात गेला. पण अनुज रावतला सोपा झेलही घेतला आला नाही. स्मिथने पुढील षटकात तीन षटकार आणि एक चौकार लगावत धावांचा पाऊस पाडला. स्मिथच्या या तुफानी खेळीच्या बळावर पंजाबने 206 धावांचा पाठलाग यशस्वीपणे केला. फाफ म्हणाला की, ‘आमची गोलंदाजी चांगली होती. पण मोक्याच्या क्षणी झेल सुटल्याचा आम्हाला फटका बसला. स्मिथचा झेल झाला असता तर अखेरच्या षटकात बचाव करण्यासाठी आम्हाला 10 – 15 धावा असत्या. पण मोक्याच्या क्षणी झेल सुटला. त्याशिवाय मैदानावर पडणारे दवांमुळे गोलंदाजी करणं कठीण होतं. त्याचप्रमाणे पंजाबने पावरप्लेमध्ये चांगली फलंदाजी करत पाया रचला होता.’
दरम्यान, नाणेफेक जिंकून पंजाब संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या आरसीबीच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत पंजाबसमोर 206 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. परंतु, या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिलाय. नाणेफेक गमवल्यानंतर मैदानात आलेल्या आरसीबीच्या संघाची आक्रमक सुरुवात केली. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि अनूज रावत यांनी पहिल्या विकेट्ससाठी 50 धावांची भागीदारी केली. त्यानंतर राहुल चाहरनं अनूज रावतच्या रुपात आरसीबीला पहिला झटका दिला. त्यानंतर डू प्लेसिसनं विराट कोहलीसोबत मिळून 118 धावांची केली. दरम्यान, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहनं आठराव्या षटकातील पहिल्या चेंडूवर फाफ डू प्लेसिसची विस्फोट खेळी संपुष्टात आणली. त्यांतनंतर विराट कोहली आणि दिनेश कार्तिकनंही आक्रमक खेळी दाखवत संघाचा डाव 200 पार पाठवला. विराट कोहलीनं 29 चेंडूत 41 तर, दिनेश कार्तिकनं 14 चेंडूत 32 धावा केल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंह आणि राहुल चाहर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवली. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आरसीबीच्या संघाकडून मैदानात उतरलेल्या कर्णधार मयांक अग्रवाल आणि शिखर धवननं संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेट्ससाठी 71 धावांची भागेदारी केली. त्यानंतर वानिंदू हसरंगानं पंजाबच्या संघाला पहिला झटका दिला. मयांक अग्रवालनं 24 बॉलमध्ये 32 धावा केल्या. त्यानंतर भानूका राजापक्क्ष मैदानात आला. शिखर धवनसोबत मिळून त्यानं खेळ पुढे चालवला. दरम्यान, मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर शिखर धवन झेलबाद झाला. शिखरपाठोपाठ राज बावाही शून्यावर बाद झाला. पंजाबनं हा सामना गमावला असं वाटत असताना शाहरूख खान आणि ओडियन स्मिथनं आक्रमक फलंदाजी करत सामना फिरवला. शाहरूख खाननं 20 बॉलमध्ये 24 तर, ओडियन स्मिथनं 8 बॉलमध्ये 25 धावा केल्या. ज्यामुळं पंजाबच्या संघाला 5 विकेट्स राखून आरसीबीवर विजय मिळवता आलाय. आरसीबीकडून मोहम्मद सिराजनं दोन विकेट्स मिळवल्या. तर, आकाश दिप, वानिंदु हसरंगा आणि हर्षल पटेलनं प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवली.