एक्स्प्लोर

ipl 2022 : सिनेमा बघितला, उत्साह संचारला, 205 धावांचं आव्हान सहज पार केलं, पंजाबच्या मोठ्या विजयाचं गुपित

IPL 2022, RCB vs PBK : पंजाबने आरसीबीचा पराभव करत आयपीएलच्या 15 व्या हंगामाची सुरुवात दणक्यात केली. रविवारी झालेल्या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 205 धावांचा डोंगर उभा केला होता.

IPL 2022, RCB vs PBK : पंजाबने आरसीबीचा पराभव करत आयपीएलच्या 15 व्या हंगामाची सुरुवात दणक्यात केली. रविवारी झालेल्या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 205 धावांचा डोंगर उभा केला होता. पंजाब संघाला 20 षटकांत हे आव्हान पार करायचं होतं. पंजाबने अतिशय आरामात 208 धावा फलकावर लावत अशक्यप्राय विजय मिळवला. या विजयामध्ये चित्रपट हा भाग आहे. सामन्यानंतर पंजाबच्या खेळाडूनं विजयाचं गुपित उघड केले.

आरसीबीविरोधातील सामन्यात ओडियन स्मिथने ताबोडतोड फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. स्मिथने 8 चेंडूत  25 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान स्मिथन तीन षटकार आणि एक चौकार लगावला.  स्मिथने या खेळीचं आणि संघाच्या विजयाचं गुपित उलगडलेय. स्मिथने सांगितले की, सामन्याआधी संपूर्ण संघाने '14 PEAKS' हा चित्रपट पाहिला होता. या चित्रपटामुळे संघामध्ये प्रचंड आत्मविश्वास आला. त्यामुळेच आम्ही 206 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करु शकलो. 

दरम्यान, नाणेफेक जिंकून पंजाब संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या आरसीबीच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत पंजाबसमोर 206 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. परंतु, या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिलाय.

नाणेफेक गमवल्यानंतर मैदानात आलेल्या आरसीबीच्या संघाची आक्रमक सुरुवात केली. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि अनूज रावत यांनी पहिल्या विकेट्ससाठी 50 धावांची भागीदारी केली. त्यानंतर राहुल चाहरनं अनूज रावतच्या रुपात आरसीबीला पहिला झटका दिला. त्यानंतर डू प्लेसिसनं विराट कोहलीसोबत मिळून 118 धावांची केली. दरम्यान, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहनं आठराव्या षटकातील पहिल्या चेंडूवर फाफ डू प्लेसिसची विस्फोट खेळी संपुष्टात आणली.  त्यांतनंतर विराट कोहली आणि दिनेश कार्तिकनंही आक्रमक खेळी दाखवत संघाचा डाव 200 पार पाठवला. विराट कोहलीनं 29 चेंडूत 41 तर, दिनेश कार्तिकनं 14 चेंडूत 32 धावा केल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंह आणि राहुल चाहर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवली. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आरसीबीच्या संघाकडून मैदानात उतरलेल्या कर्णधार मयांक अग्रवाल आणि शिखर धवननं संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेट्ससाठी 71 धावांची भागेदारी केली. त्यानंतर वानिंदू हसरंगानं पंजाबच्या संघाला पहिला झटका दिला. मयांक अग्रवालनं 24 बॉलमध्ये 32 धावा केल्या. त्यानंतर भानूका राजापक्क्ष मैदानात आला. शिखर धवनसोबत मिळून त्यानं खेळ पुढे चालवला. दरम्यान, मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर शिखर धवन झेलबाद झाला. शिखरपाठोपाठ राज बावाही शून्यावर बाद झाला. पंजाबनं हा सामना गमावला असं वाटत असताना शाहरूख खान आणि ओडियन स्मिथनं आक्रमक फलंदाजी करत सामना फिरवला. शाहरूख खाननं 20 बॉलमध्ये 24 तर, ओडियन स्मिथनं 8 बॉलमध्ये 25 धावा केल्या. ज्यामुळं पंजाबच्या संघाला 5 विकेट्स राखून आरसीबीवर विजय मिळवता आलाय. आरसीबीकडून मोहम्मद सिराजनं दोन विकेट्स मिळवल्या. तर, आकाश दिप, वानिंदु हसरंगा आणि हर्षल पटेलनं प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSindhudurg : तळकोकणात जंगली हत्तींचा हैदोस, माड बागायत आणि फळपिकाची नासधूसCity 60 SuperFast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा : 19 May 2024Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 08 PM : 19 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
पुणे अपघात, आरोपी वेंदातला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसोबत काम; न्यायालयाने 'या' अटी व शर्तींवर दिला जामीन
पुणे अपघात, आरोपी वेंदातला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसोबत काम; न्यायालयाने 'या' अटी व शर्तींवर दिला जामीन
Embed widget