(Source: ECI/ABP News/ABP Majha)
GT vs PBKS Playing 11 : पांड्या विरुद्ध 'गब्बर'! 'हे' 11 खेळाडू मैदानात उतरणार, मोहालीची खेळपट्टी कशी आहे? जाणून घ्या
GT vs PBKS, Mohali Pitch Report : आयपीएल 2023 मध्ये आज 13 एप्रिलला गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) सामना रंगणार आहे.
Gujrat Titans vs Punjab Kings : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या (IPL 2023) 18 व्या सामन्यात पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujrat Titans) हे दोन संघ एकमेकांशी भिडणार आहेत. आयपीएल 16 व्या (IPL 2023) हंगामातील ही लढत पंजाबच्या घरच्या मैदानावर मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर (Punjab Cricket Association Stadium)पार पडणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स आणि शिखर धवनच्या नेतृत्त्वात पंजाब किंग्स यांच्यात आज चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
PBKS vs GT IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
पंजाब किंग्स (PBKS) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात आज 13 एप्रिल रोजी गुरुवारी (PBKS vs GT) रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. हा पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. नाणेफेक संध्याकाळी 7.00 वाजता होईल.
Punjab Cricket Association Stadium, Mohali Pitch Report : मोहालीची खेळपट्टी कशी आहे?
मोहालीतील (Mohali) पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमची (Punjab Cricket Association Stadium) खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजीसाठी अनुकूल मानली जात आहे. येथील मैदान लहान असल्यामुळे येथे जास्त चौकार-षटकार मारले जातात. येथे झालेल्या सहा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार वेळा 200 हून अधिक धावसंख्या करण्यात आली होती. या मैदानावर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा झाला.
GT vs PBKS, IPL 2023 : दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11
IPL 2023, GT Playing 11 : गुजरात संभाव्य प्लेईंग 11
शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), साई सुधारसन, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), राशिद खान, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, रविश्रीनिवासन साई किशोर
IPL 2023 PBKS Playing 11 : पंजाब संभाव्य प्लेईंग 11
शिखर धवन (कर्णधार), शाहरुख खान, सॅम करन, लिआम लिव्हिंगस्टोन, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), राहुल चहर, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, अर्शदीप सिंग, कगिसो रबाडा
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
GT vs PBKS Match Preview : गुजरात विरुद्ध पंजाब लढत, कोण ठरणार वरचढ? पाहा हेड टू हेड आकडेवारी