IPL 2023 : पहिले पाढे पंचावन्न, नऊ वर्षामध्ये पंजाबचे किंग्स प्ले ऑफपासून दूरच!
IPL 2023 : पंजाब किंग्सने गेल्या 9 वर्षांमध्ये एकाच जागी स्थिर आहे. तर पंजाब प्ले ऑफच्या शर्यतीपासून देखील लांब आहे.
IPL 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) च्या हंगमात 66 वा सामना पंजाब किंग्स (Panjab Kings) आणि राजस्थान रॉयल्समध्ये (Rajsthan Royalas) खेळवण्यात आला. या सामन्यात राजस्थानने पंजाबवर सहा गडी राखून मात केली.पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब किंग्स संघाची सुरुवात खराब झाली. पंजाब संघाने पाच गडी गमावून 187 धावांचा पल्ला गाठला.पंजाब किंग्सनं राजस्थान रॉयल्सला 188 धावांचं लक्ष्य दिलं आहे. पावर प्लेमध्ये पंजाबच्या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांनी पुरतं नमवलं.
पंजाब किंग्सकडून सॅम करनने 31 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या. जितेश शर्माने 44 आणि शाहरुख खानने 23 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या. अथर्व तायडेने 19 आणि शिखर धवनने 17 धावांचे योगदान दिलं. लियाम लिव्हिंगस्टोनने नऊ आणि प्रभसिमरन सिंगने दोन धावा केल्या.पहिल्याच षटकात पंजाबला पहिला झटका बसला. बोल्ड उत्तम गोलंदाजी करताना दुसऱ्या चेंडूवर प्रभसिमरन सिंहला झेलबाद केलं. प्रभासिमरनला दोन चेंडूत केवळ दोन धावा करता आल्या. पंजाबने तीन षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 30 धावा केल्या. शिखर धवन कर्णधार असलेल्या पंजाबच्या संघाने या पराभवासह प्ले ऑफच्या शर्यतीतला आपला प्रवास संपवला आहे. पंजाब किंग्सची अशी अवस्था फक्त याच हंगामात नाही तर मागील काही हंगामात अशीच निराशाजनक परिस्थिती आहे.
आयपीएलच्या खेळात सगळ्यात कमकुवत संघापैकी एक संघ आहे. या हंगामात चांगला खेळ खेळण्यासाठी पंजाबने त्यांचा कर्णधार सुद्धा बदलला. या हंगामात शिखर धवनने पंजाबचे कर्णधार पद स्विकारले होते. पंजाबच्या संघाने आयपीएलच्या 16 व्या हंगामात चौदा सामन्यांपैकी सहा सामने जिंकले आहेत तर आठ सामन्यामध्ये निराशा पदरात पाडून घेतली आहे. गुणतालिकेत 12 अंकांसह सातव्या स्थानावर आहे.
पंजाबचा निराशाजनक रेकॉर्ड
राजस्थान रॉयल्स सोबत हरल्यानंतर पंजाबच्या संघाने एक निराशाजनक रेकॉर्ड केला आहे. पंजाब किंग्जने गेल्या नऊ वर्षांमध्ये एकाच स्थानावर आहे. पंजाब गेल्या नऊ वर्षांमध्ये ग्रुप सामन्यांच्या पुढे गेली नाही आहे. फायनल आणि सेमीफायनलचा सामना दूरच पण पंजाबने साधं प्ले ऑफमध्ये सुद्धा स्थान मिळवलं नाही. पंजाबचा संघ लीग राऊंडमधूनच स्पर्धेच्या बाहेर जात आहे. तर 2014 मध्ये शेवटचं पंजाबचा संघ प्ले ऑफमध्ये पोहचला होता. तेव्हा पंजाबचा संघ उपविजेता देखील ठरला होता. आयपीएलच्या 16 व्या हंगामात पंजाब दोनदा लीग राऊंडपासून पुढे सरकला होता. तर 2009 मध्ये पंजाब सेमीफायनल पर्यंत पोहचण्यात यशस्वी झाला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
IPL 2023 : धोनीची क्रेझ कायम! चेन्नई संघाचा सामना पाहण्याला प्रेक्षकांची पसंती