MS Dhoni : छोट्या झिवासोबत खेळण्यासाठी येणार इटुकला पाहुणा? धोनी पुन्हा बाबा होणार असल्याच्या चर्चा, पत्नी साक्षीचे फोटो व्हायरल
MS Dhoni Wife Pregnancy News : धोनी आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे. धोनी दुसऱ्यांदा बाबा होणार या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे
MS Dhoni Wife : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) सध्या आयपीएलमध्ये (Indian Premier League) दमदार कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) चेन्नई (CSK) संघाचा कर्णधार धोनी दमदार फलंदाजी आणि विकेटकिपिंग करताना दिसत आहे. यासोबतच धोनी सध्या त्याच्या क्रिकेटमधील निवृत्तीबाबतही शक्यत व्यक्त केली जात आहे. अशातच आता धोनी आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे. धोनी दुसऱ्यांदा बाबा होणार या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे.
Dhoni Wife Pregnant Again? : छोट्या झिवासोबत खेळण्यासाठी येणार इटुकला पाहुणा?
महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षीनं सलमान खानच्या बहिणीच्या ईद पार्टीमध्ये हजेरी लावली. यावेळी साक्षी आणि मुलगी झिवा दोघीही ट्रेडिशनल अंदाजात दिसल्या. मात्र, यावेळी साक्षीनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. याचं कारण म्हणजे साक्षी यावेळी कॅमेऱ्यापासून स्वत:ला कॅमेऱ्यापासून काहीशी वाचवताना दिसली. साक्षी या पार्टीमध्ये पोहोचली तेव्हा ती कॅमेऱ्यासमोर पोट लपवताना दिसली. यामुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.
Dhoni Wife Pregnancy News : धोनी पुन्हा बाबा होणार असल्याच्या चर्चा
धोनीची पत्नी साक्षी रावत सध्या तिच्या व्हायरल फोटोमुळे चर्चेत आली आहे. अर्पिता खान आणि आयुष शर्माच्या ईद पार्टीदरम्यान, साक्षी आणि मुलगी झिवा या दोघी उपस्थित होत्या. पण यावेळी साक्षी तिचं पोट ओढणीनं लपवताना दिसली. साक्षी अनारकली ड्रेसमध्ये फार सुंदर दिसत होती, पण साक्षीचं अवघड चालणं आणि हावभाव यामुळे तिनं पापाराझींचं लक्ष वेधून घेतलं. साक्षीचं चालणं पाहून नेटिझन्सला ती दुसर्यांदा प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावत आहेत.
पाहा व्हायरल व्हिडीओ :
View this post on Instagram
ईद पार्टीदरम्यानचे साक्षी आणि झिवाचा फोटो व्हायरल झाल्यावर नेटिझन्सनी साक्षी गरोदर असल्याची शक्यता वर्तवताना दिसत आहेत. एका यूजर व्हिडीओच्या कमेंटमध्ये लिहिलं की, 'साक्षी पोट का लपवत आहे आणि विचित्र हावभाव का करत आहे… ती नक्कीच गरोदर आहे.' दुसर्या नेटकऱ्याने कमेंट केलीय, 'ती प्रेग्नंट असल्याचं दिसतंय. नक्कीच.' दरम्यान, एका नेटिझननं या अफवा असल्याचं म्हटलं आहे. त्याने 2021 मध्ये साक्षी प्रेग्नेंट असल्याच्या अफवा समोर आल्याचं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :