IPL 2023 : भर मैदानात ईशाननं शुभमनच्या कानशिलात लगावली; मुंबई विरुद्ध गुजरातच्या सामन्यापूर्वीची घटना, नेमकं घडलं तरी काय? Video
Ishan Kishan Slaps Shubman Gill : व्हायरल व्हिडीओमध्ये भरमैदानात ईशान किशन शुभमन गिलच्या कानाखाली लगावताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
MI vs GT, IPL 2023 : आज आयपीएलमध्ये पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स (MI) आणि गतविजेता संघ गुजरात टायटन्स (GT) यांच्यात सामना रंगणार आहे. 25 एप्रिल रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान, आजच्या सामन्यापूर्वी मुंबई आणि गुजरात संघातील खेळाडूंचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये भरमैदानात ईशान किशन (Ishan Kishan) हा शुभमन गिलच्या (Shubman Gill) कानाखाली लगावताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
IPL 2023, MI vs GT : भर मैदानात ईशाननं शुभमनच्या कानशिलात लगावली
व्हायरल व्हिडीओमध्ये मुंबई इंडियन्स संघातील खेळाडू ईशान किशान आणि गुजरात टायटन्स संघातील खेळाडू शुभमन गिल यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ईशान किशन भरमैदानात शुभमन गिलच्या कानाखाली लगावताना दिसत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लाईक केलं आहे. याशिवाय अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत हा व्हिडीओ शेअरही केला आहे.
IPL 2023, GT vs MI : मुंबई विरुद्ध गुजरातच्या सामन्यापूर्वीची घटना
इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्स विरोधात लढत पाहायला मिळणार आहे. अहमदबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सराव करताना दिसत आहेत. सरावादरम्यान शुभमन गिल आणि ईशान किशन या दोघांची भेट होते. यावेळी ईशन किशन शुभमन गिलच्या कानाखाली लगावतो. दरम्यान, ईशानने शुभमनला मस्करी म्हणून कानाखाली मारली. इतकंच नाहीतर त्यानंतर शुभमनही ईशानला मस्करीमध्ये मारताना दिसत आहे. हे दोघेही खेळाडू एकमेकांचे चांगले मित्र आहेत. या खेळाडूंचं चांगलं जमतं आणि ते एकमेकांबरोबर अशी मजा-मस्करी करताना नेहमी पाहायला मिळतं.
पाहा व्हायरल व्हिडीओ : नेमकं घडलं तरी काय? Video
IPL 2023, GT vs MI : मुंबई आणि गुजरात संघ आमने-सामने
गुजरात संघ सध्या आयपीएल 2023 गुणतालिकेमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. गुजरात सने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील सहामन्यांपैकी चार विजय नोंदवून हंगामाची सुरुवात चांगली केली आहे. तर पाहुण्या मुंबई इंडियन्स संघाने पहिल्या सहा सामन्यांपैकी तीन सामने जिंकले तर तीन सामने गमावले आहेत. मुंबईं संघ पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :