(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MsDhoni | माझी पत्नी लियोनेल मेस्सीची फॅन, पण आमचा मेस्सी धोनीच : सुरेश रैना
भारतीय फलंदाज सुरेश रैना चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) सोबत एका लाइव्ह इन्स्टाग्राम चॅटमध्ये सहभागी झाला होता. यावेळी बोलताना रैना म्हणाला की, ''माझ्या पत्नीला फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू लियोनेल मेस्सी प्रचंड आवडतो. परंतु, माझ्यासाठी आणि सीएसकेसाठी एमएस धोनीच मेस्सी आहे.'
मुंबई : कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे संपूर्ण जग ठप्प झालं आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळत आहे. अनेक देशांत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याचा परिणाम क्रिडा क्षेत्रावरही झाला आहे. त्यामुळे अनेक खेळाडू आपल्या घरी क्वॉलिटी टाईम स्पेंड करत आहेत. तसेच अनेक खेळाडू लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सोशल कॅम्पेन्समध्ये सहभागी होत आहेत.
अनेक खेळाडू सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. अशातच भारतीय फलंदाज सुरेश रैनाही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळत आहे. तो नेहमी आपले अपडेट्स सोशल मीडियामार्फत आपल्या फॅन्सपर्यंत पोहोचवत असतो. अशातच सुरेश रैना काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) सोबत एका लाइव्ह इन्स्टाग्राम चॅटमध्ये सहभागी झाला होता. यावेळी 33 वर्षीय भारतीय फलंदाज सुरेश रैना म्हणाला की, 'माझ्या पत्नीला फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू लियोनेल मेस्सी प्रचंड आवडतो. परंतु, माझ्यासाठी आणि सीएसकेसाठी एमएस धोनीच मेस्सी आहे.'
रैनाने सांगितलं की, 'जेव्हा कधी माझी पत्नी एखादी मॅच पाहण्यासाठी येते, त्यावेळी ती मला विचारते की, माहीभाईने हेल्मेट विकेटच्या मागे का ठेवलं आहे? तसेच आपण एकाच साइडवर क्रिकेट खेळू शकत नाही का? आपण सारखी साइड का बदलत असतो?' यावेळी बोलताना रैना म्हणाला की, 'माझी पत्नी फुटबॉलची खूप मोठी फॅन आहे आणि तिला दिग्गज फुटबॉलर मेस्सी प्रचंड आवडतो. परंतु, आमच्यासाठी धोनीच आमचा मेस्सी आहे.'
धोनी गेल्या वर्षी जुलैपासूनच भारताच्या विश्व चषकानंतरपा संघाबाहेर आहे. परंतु, रैनाने सांगितल्यानुसार, 38 वर्षीय खेळाडू जेव्हा चेन्नई सुपर किंग्सच्या ट्रेनिंग सेशलसाठी आला होता. तेव्हा तो फार फिट दिसून आला होता. महेंद्र सिंग धोनी आयपीएल 2020 आधी एका प्रॅक्टिस सामन्यामध्ये 91 चेंडूंवर 123 धावा ठोकल्या होत्या.
इन्स्टाग्राम चॅटमध्ये सुरेश रैनाला धोनी पुन्हा भारतासाठी खेळणार का? हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी बोलताना रैना म्हणाला की, 'त्यांच्याकडे अजून खूप क्रिकेट बाकी आहे. जर त्यांनी या प्रश्नाचं उत्तर आपल्या बॅटने दिलं तर ते सर्वात उत्तम राहिल.'संबंधित बातम्या :
सेहवागने सांगितलेला 'बाप बाप होता है' प्रसंग कधी घडलाच नाही, शोएब अख्तरचा दावा
... म्हणून इंग्लंडचा 'हा' विकेटकिपर धोनीला मानतो आदर्श!
Coronavirus | IPL 2020 रद्द झाल्यास मोठं नुकसान, पाच मोठे फटके कोणते?