(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mitchell Marsh : दिल्लीच्या पराभवानंतर प्रथमच बोलला मिचेल मार्श, पाहा नेमकं काय म्हणाला?
दिल्ली कॅपीटलचा धडाकेबाज फलंदाज मिचेल मार्शने आयपीएलमध्ये झालेल्या पराभवानंतर प्रतिक्रिया दिली आहे
Mitchell Marsh On Delhi Capitals : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि दिल्ली कॅपीटलचा धडाकेबाज फलंदाज मिचेल मार्शने आयपीएलमध्ये झालेल्या पराभवानंतर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धची आमची मॅच ही करो या मरो ची होती. मात्र, त्यामध्ये आमच्या टीमचा पराभव झाला. त्यामुळं दिल्ली कॅपीटलचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकला नसल्याचे मार्शने सांगितले.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ आयपीएल 2022 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकला नाही ही खेदाची गोष्ट असल्याचे मार्शने म्हटले आहे. दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या अंतिम साखळी सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स या संघाला पराभूत करणे आवश्यक होते. त्यामुळे त्यांचे प्लेऑफमधील स्थान निश्चित झाले असते. पण प्रशिक्षक रिकी पाँटिंगचा संघ दिल्ली कॅपीटल हा पाच विकेट्सनी पराभूत झाला आणि IPL 2022 मधून बाहेर पडला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला.
नेमकं काय म्हणाला मार्श
मिचेल मार्शनं लीगच्या सुरुवातीला कोरोनाच्या विरोधात लढा दिला. कोरोनावर मात केल्यानंतर मे मध्ये त्यानं आयपीएल खेळण्यास सुरुवात केली. शेवटच्या पाच सामन्यात मार्शने उत्कृष्ट खेळी केली. ज्यामध्ये 11 मे रोजी राजस्थान रॉयल विरुद्ध झालेल्या सामन्यात मार्शन 62 बॉलमध्ये 89 धावांची दमदरा बँटींग केली होती. आम्ही आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचू शकलो नाही हे दु:खद आहे. मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आपल्या खेळाडूंची कशी काळजी घेतो याची मला खरी जाणीव झाली. पाँटिंगने मला दिल्लीत आणले. त्याने मला खरोखरच एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून निवडल्याचे मार्श म्हणाला.
7 जूनपासून श्रीलंकेविरुद्ध T20 मालिका
दरम्यान, मार्शला आता 7 जूनपासून श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेत आणि नंतर आयलँडर्सविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत खेळायचे आहे. ऑस्ट्रेलियन संघाकडून तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याची शक्यता आहे. मला आशा आहे की मी तिसऱ्या क्रमांकावर जेवढे सातत्य राखू शकेन आणि तिथेच राहू शकेन. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खरोखरच कठीण आहे. पण तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल की तुम्ही चांगली कामगिरी करु शकता. मला वाटते की गेल्या 12 महिन्यांत मी यावर विश्वास ठेवला आहे.