IPL 2022 : बूम बूम बुमराहचा परफेक्ट यॉर्कर, लिविंगस्टोनचा त्रिफाळा उध्वस्त
MI vs PBKS, IPL 2022 : मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहला यॉर्कर किंग म्हणून ओळखलं जाते. जसप्रीत बुमराहाच्या धारधार गोलंदाजीसमोर दिग्गज फलंदाजही गुडघे टेकतात.
MI vs PBKS, IPL 2022 : मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहला यॉर्कर किंग म्हणून ओळखलं जाते. जसप्रीत बुमराहाच्या धारधार गोलंदाजीसमोर दिग्गज फलंदाजही गुडघे टेकतात. बुमराहचा यॉर्कर अनेकांना अडचणीत टाकतो. पंजाबविरोधातील सामन्यातही जसप्रीत बुमराहने भेदक आणि परफेक्ट यॉर्कर फेकत लिविंगस्टोनच्या दांड्या उडावल्या.
बुमराहाचा यॉर्कर इतका अचूक होता की लिविंगस्टोनला काही समजण्याच्या आतच दांड्या गुल झाल्या होत्या. मुंबई इंडियन्सकडून 15 वे षटक टाकण्यासाठी बुमराह आला होता. जसप्रीत बुमराहने तिसरा चेंडू यॉर्कर फेकला, पंजाबच्या लिविंगस्टोनला हा चेंडू समजला नाही. चेंडूने थेट यष्ट्या उद्धवस्त केल्या. लिविंगस्टोन अवघ्या दोन धावांवर बाद झाला.
इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू लियाम लिविंगस्टोन यंदा पंजाब संघाकडून खेळत आहे. यंदाच्या हंगामात लिविंगस्टोन याने तुफानी फलंदाजी केली आहे. लिविंगस्टोनने याने चेन्नई आणि गुजरातविरोधात वादळी फलंदाजी केली. या दोन्ही सामन्यात 200 च्या स्ट्राइक रेटने लिविंगस्टोन याने अर्धशतकी खेळी केली. पण पुण्यातील एमसीए स्टेडिअममध्ये सुरु असलेल्या सामन्यात मुंबईच्या बुमराहचा यॉर्कर लिविंगस्टोनला समजला नाही. अवघ्या दोन धावांवर लिविंगस्टोनला माघारी परतावे लागले.
पाहा बुमराहाचा भेदक यॉर्कर
Sudden goosebumps #jaspritbumrah #MIvsPBKS #RohitSharma𓃵 pic.twitter.com/hfM0hD3Yxv
— Satyasadhan Mudly (@ImSatya5) April 13, 2022
मुंबईला विजयासाठी 199 धावांची गरज
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कर्णधार मयांक आणि स्टार फलंदाज शिखरच्या अर्धशतकाने पंजाबने 198 धावांचा डोंगर उभा केला. मुंबईला विजयासाठी 199 धावांचे आव्हान देण्यात आले आहे. मयांकने अधिक तुफान फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर 52 धावांवर तो बाद झाला. ज्यानंतर शिखरने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. बेअरस्टोने त्याला काहीशी साथ दिली, पण बेअरस्टो 12 धावा करुनच तंबूत परतला. त्यानंतर शिखरला खास कोणाची साथ न मिळाल्याने अखेर तोही 70 धावांवर झेलबाद झाला. चांगल्या सुरुवातीनंतर मधल्या काही षटकात पंजाबची फलंदाजी ढासळत होती. पण अखेरच्या काही षटकात जितेश शर्मा आणि शाहरुख खान यांनी पुन्हा स्फोटक फलंदाजी दाखवली. जितेशने 15 चेंडूत 30 तर शाहरुखने 6 चेंडूत 15 धावा केल्या. ज्यामुळे पंजाबचा स्कोर 198 धावांपर्यंत पोहोचला.