एक्स्प्लोर

IPL Qualifier 2 : मुंबई इंडियन्सचा प्लेऑफमध्ये विक्रम, रोहित शर्माचा संघ प्लेऑफमध्ये अजिंक्य, हार्दिक पांड्याचं टेन्शन वाढणार?

MI vs GT, IPL 2023 : आज आयपीएलच्या अंतिम फेरीच्या तिकीटासाठी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या संघात लढत पाहायला मिळणार आहे.

GT vs MI, IPL 2023 Qualifier 2 : इंडियन प्रीमियर लीगचा यंदाचा सोळावा हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आहे. आज आयपीएल 2023 मधील दुसरा क्वालिफायर सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गुजरात टायटन्स (Gujrat Titans) यांच्यात खेळवला जाणार आहे. 26 मे रोजी, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) हा सामना रंगणार आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाला आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. आयपीएल फायनल सामन्याच्या तिकीटासाठी गुजरात आणि मुंबई दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.

मुंबई आणि गुजरात संघात लढत

पाच वेळा विजेता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ आणि गतविजेता गुजरात टायटन्स संघ (Gujrat Titans) अंतिम फेरीपासून एक पाऊल दूर आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सचं आव्हान असेल. यंदाच्या आयपीएलमध्ये सुरुवातीपासूनच गुजरात संघाचा चांगला फॉर्म पाहायला मिळाला आहे. मुंबई इंडियन्स संघाची यंदाच्या हंगामातील सुरुवात काही खास राहिली नाही, मात्र संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरला.

मुंबई इंडियन्स संघाची प्लेऑफमधील आकडेवारी वरचढ

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स दोन्ही संघ दोन वेळा आमनेसामने आले होते. यामध्ये दोन्ही संघानी प्रत्येकी एक सामना आपल्या नावे केला. गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवलं. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्त्वात मुंबई संघाने हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करत बदला घेतला. आता हे दोन्ही संघ आज पुन्हा आयपीएल 2023 क्वालिफायर 2 मध्ये दोन्ही संघ या मोसमात तिसऱ्यांदा भिडतील. गुजरात संघाच्या घरच्या मैदानावर हा सामना होत असल्याने गुजरातला काहीसा फायदा आहे. पण मुंबई इंडियन्स संघाची प्लेऑफमधील आकडेवारी वरचढ आहे.

मुंबई इंडियन्स 6 वर्षांपासून प्लेऑफमध्ये अजिंक्य

मुंबई इंडियन्सचा संघ मागील सहा आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांमध्ये अजिंक्य आहे. मुंबई संघाने आयपीएल 2017 मध्ये शेवटचा प्लेऑफ सामना गमावला होता. त्यानंतरच्या आयपीएल प्लेऑफधील सर्व सामने जिंकले आहेत. आयपीएल 2017 मध्ये मुंबई संघाला क्वालिफायर 1 मध्ये रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडून पराभव पत्करावा लागला होता. पण तरीही मुंबई संघाने आयपीएल 2017 चं विजेतेपद जिंकलं.  मुंबई संघ 2017 नंतर, 2019, 2020 आणि आता 2023 मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 14 प्लेऑफ सामने खेळले आहेत. त्यापैकी 11 प्लेऑफ सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळाला. मुंबई इंडियन्स संघ सहा वेळा अंतिम फेरीत पोहोचला असून पाच वेळा चॅम्पियन ठरला आहे. प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतर मुंबई संघाची कामगिरी दमदार आहे. त्यामुळे ही आकडेवारी गुजरात टायटन्सचं टेन्शन वाढवू शकते.

अंतिम फेरीच्या तिकीटासाठी रणसंग्राम

आयपीएल 2023 (IPL 2023) च्या एलिमिनेटर सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा 81 धावांनी पराभव करत सलग सातवा विजय मिळवला. त्यानंतर मुंबई इंडियन्स दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पोहोचला. आता आयपीएल 2023 चा दुसरा क्वालिफायर सामना आज, 26 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या  :

IPL 2023 : आयपीएलमधून बाहेर पडूनही RCB नंबर 1, चेन्नई सुपर किंग्सला टाकलं मागे

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
IPL 2026 Schedule : मोठी बातमी, आयपीएलचं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
IPL चं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget