एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

MI vs GT : मुंबई इंडियन्सला अंतिम फेरीत तिकीट मिळणार की गतविजेता गुजरात बाजी मारणार? आकडेवारीत मुंबईचं पारड जड

IPL 2023 Qualifier 2 : आज आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरात आणि मुंबई संघ आमने-सामने येतील.

GT vs MI, IPL 2023 Qualifier 2 : आयपीएल 2023 (Indian Premier League) मधील दुसरा क्वालिफायर (IPL Qualifier 2) सामना आज पाच वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गतविजेत्या गुजरात टायटन्स (Gujrat Titans) या संघात रंगणार आहे. आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना पार पडणार आहे. मुंबई आणि गुजरात यांच्यातील विजयी संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. या सामन्यातील विजेता संघाचा सामना रविवारी अंतिम फेरीत चार वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्स संघाशी होईल. आयपीएल 2023 चा बहुप्रतिक्षित अंतिम सामना 28 मे रोजी पार पडणार आहे.

कुणाला मिळणार अंतिम फेरीचं तिकीट?

चेन्नई सुपर किंग्स संघाने (CSK) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पहिल्या क्वालिफायर सामन्यामध्ये (IPL 2023 Qualifier 1) गुजरात टायटन्सचा (GT) पराभव करून थेट अंतिम फेरीत धडक मारली. यंदाच्या मोसमात याआधी मुंबई आणि गुजरात हे दोन संघ आमने-सामने आले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. या मोसमाच्या सुरुवातीला गुजरात टायटन्सने (GT) मुंबई इंडियन्सला (MI) घरच्या मैदानावर पराभूत केलं होतं. त्यानंतर पुढील सामन्यात मुंबई इंडियन्सनं पराभवाचा वचपा काढत विजय मिळवला. दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगच्या प्लेऑफमधील मुंबई इंडियन्सचा दमदार विक्रम पाहता आकडेवारीनुसार, मुंबईचं पारड जड आहे. 

GT vs MI Head to Head : मुंबई विरुद्ध गुजरात हेड-टू-हेड

आयपीएलमध्ये आत्तापर्यंत मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स संघ तीन वेळा आमने-सामने आले आहे. या आकडेवारीनुसार, मुंबई इंडियन्सचं पारड जड आहे. तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांत गुजरात टायटन्सला मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. गतविजेत्याने अहमदाबादमध्ये या हंगामाच्या सुरुवातीला विक्रमी आयपीएल विजेत्या मुंबईचा पराभव केला. मुंबई इंडियन्सने (MI) आयपीएल 2022 (IPL 2022) आणि आणि आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये प्रत्येकी एका लीग सामन्यात गुजरात टायटन्सचा (GT) पराभव केला.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार सामना

पाच वेळा विजेता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ सातव्या अंतिम फेरीपासून एक पाऊल दूर आहे. आयपीएलचा दुसरा क्वालिफायर सामना आज, 26 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Akash Madhwal Fees : RCB कडून केवळ नेट प्रॅक्टिस, आता मुंबईचा स्ट्राईकर, आकाश मधवालला MI ने किती रुपयात केले होते खरेदी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी? खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले मी...
देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी? खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले मी...
Gautam Adani : प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...
Rohit Sharma : रोहित शर्माचा जलवा! मुंबईत ज्या घोषणांनी हार्दिक पांड्याला हैराण करून सोडलं, त्याच घोषणा रोहितसाठी ऑस्ट्रेलियात सुद्धा गरजल्या
Video : रोहित शर्माचा जलवा! मुंबईत ज्या घोषणांनी हार्दिक पांड्याला हैराण करून सोडलं, त्याच घोषणा रोहितसाठी ऑस्ट्रेलियात सुद्धा गरजल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :1 डिसेंबर 2024 :  ABP MajhaYugendra Pawar : माझ्यासह 11 उमेदवारांचे मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज - युगेंद्र पवारSanjay Raut PC | तब्येतीवरून शिंदेंना टोला, सत्तास्थापनेवरून फडणवीसांनाही खडसावलंEknath Shinde Health :  एकनाथ शिंदें आजारी; डाॅक्टरांचा विश्रांतीसाठी सल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी? खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले मी...
देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी? खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले मी...
Gautam Adani : प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...
Rohit Sharma : रोहित शर्माचा जलवा! मुंबईत ज्या घोषणांनी हार्दिक पांड्याला हैराण करून सोडलं, त्याच घोषणा रोहितसाठी ऑस्ट्रेलियात सुद्धा गरजल्या
Video : रोहित शर्माचा जलवा! मुंबईत ज्या घोषणांनी हार्दिक पांड्याला हैराण करून सोडलं, त्याच घोषणा रोहितसाठी ऑस्ट्रेलियात सुद्धा गरजल्या
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
Joe Root : क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
Nana Patole : विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
NZ vs ENG कसोटीनंतर WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! न्यूझीलंडला धक्का, जिंकूनही इंग्लंड आहे तिथेच!
NZ vs ENG कसोटीनंतर WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! न्यूझीलंडला धक्का, जिंकूनही इंग्लंड आहे तिथेच!
Embed widget