IPL 2022 : 13 मार्चला गुजरात टायटन्सचा नवा लूक येणार समोर, हार्दीकची पलटन नव्या जर्सीसाठी सज्ज
IPL 2022 : यंदा गुजरात आणि लखनौ हे दोन संघ आयपीएलमध्ये सामिल झाले आहेत. त्यामुळे यंदा 8 च्या जागी 10 संघ खेळतील.
IPL 2022 : आयपीएलमध्ये यंदा पहिल्यांदाच सामिल होणारा संघ गुजरात टायटन्सनं एक मोठी घोषणा केली आहे. संघ लवकरच आपली जर्सी रिलीज करणार आहे. संघाने त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर याबाबतची घोषणा केली. गुजरात टायटन्सने एका ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीत रविवार 13 मार्च रोजी नवी जर्सी लॉन्च होणार आहे. विशेष म्हणजे संघाने एका वेगळ्या गुजराती अंदाजात ही घोषणा केली आहे. बॉलीवुड फिल्म 'मित्रों'मधील गुजराती-हिंदी मिक्स गाणं 'कमरिया'चं बॅकग्राउंड म्यूजिक देत गुजरात टायटन्सने या तारखेची घोषणा केली आहे. या ट्वीटसोबत गुजरात टायटन्सने तुम्हीही जर्सीसाठी उत्साही आहात का? असा प्रश्नही विचारला आहे.
असा आहे गुजरातचा संघ
शिलेदार – हार्दिक पंड्या (15 कोटी), राशिद खान (15 कोटी) शुभमन गिल (8 कोटी), मोहम्मद शमी (6.25 कोटी), जेसन रॉय (2 कोटी), लॉकी फर्ग्युसन (10 कोटी), अभिनव सदरंगानी (2.6 कोटी), राहुल तेवातिया (9 कोटी), नूर अहमद (30 लाख), साई किशोर (3 कोटी), डॉमनिक ड्रेक्स (1.10 कोटी), जयंत यादव (1.70 कोटी), विजय शंकर (1.40 कोटी), दर्शन नालकंडे (20 लाख), यश दयाल (3.20 कोटी), अल्झारी जोसेफ (2.40 कोटी), प्रदीप सांगवान (20 लाख), मॅथ्यू वेड (2.40 कोटी), वृद्धिमान साहा – (1.90 कोटी), डेविड मिलर – ( 3 कोटी), वरुण अरॉन- 50 (लाख रुपये), गुरकीरत मान सिंह- (50 लाख रुपये), नूर अहमद – (30 लाख रुपये), साईं सुदर्शन- 20 लाख रुपये
हे देखील वाचा-
- IPL 2022 Full Schedule: आयपीएल 2022 चं बिगुल वाजलं, संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कोणाचा सामना कोणाशी? पाहा एका क्लिकवर
- IPL 2022 : आयपीएलचे 70 सामने मुंबई-पुण्यात, MI-CSK वेगवेगळ्या ग्रुपमध्ये, पाहा कोणता संघ कोणत्या ग्रुपमध्ये?
- IPL Records : आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक धावा करणारे धाकड यष्टीरक्षक, 'हे' आहेत टॉप 5
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha