LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्सचा (LSG vs CSK) आठ विकेटनं दारुण पराभव केला. केएल राहुल (KL Rahul) आणि क्विंटन डी कॉक यांच्यापुढे चेन्नईची गोलंदाजी सपशेल फेल ठरली.
LSG vs CSK, IPL 2024 : लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्सचा (LSG vs CSK) आठ विकेटनं दारुण पराभव केला. केएल राहुल (KL Rahul) आणि क्विंटन डी कॉक यांच्यापुढे चेन्नईची गोलंदाजी सपशेल फेल ठरली. चेन्नईनं दिलेले 177 धावांचे आव्हान लखनौनं 6 चेंडू आणि आठ विकेट राखून सहज पार केले. लखनौकडून केएल राहुल यानं झंझावती 82 धावांची खेळी केली. तर क्विंटन डी कॉक यानेही अर्धशतक ठोकले. या विजयासह लखनौने सात सामन्यात आठ गुणांची कमाई करत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. चेन्नईचा सात सामन्यात चौथा पराभव झालाय.
चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक आणि एमएस धोनीच्या झटपट 28 धावांच्या बळावर 176 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल धावांचा पाठलाग कऱणाऱ्या लखनौनं शानदार सुरुवात केली. कर्णधार केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी शतकी भागिदारी करत विजय सूकर केला. क्विंटन डी कॉकने 43 चेंडूमध्ये 54 धावांची खेळी केली, तर केएल राहुल यानं 53 चेंडूमध्ये 82 धावांचं योगदान दिलं. महत्वाच्या सामन्यात लखनौनं चेन्नईचा आठ विकेट पराभव केला.
केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक या जोडीनं 134 धावांची सलामी दिली. 15 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर चेन्नईलं पहिलं यश मिळालं. त्यानंतर केएल राहुल यानं मोर्चा संभाळला. पण रवींद्र जाडेजानं शानदार झेल घेत केएल राहुलची खेळी संपुष्टात आणली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. केएल राहुल यानं 53 चेंडूमध्ये 82 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये राहुलने तीन षटकार आणि 9 चौकार लगावले. क्विंटन डी कॉक यानं 43 चेंडूमध्ये 54 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने पाच चौकार आणि एक षटकार ठोकला.
केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक बाद झाल्यानंतर निकोलस पूरन आणि मार्कस स्टॉयनिस यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. निकोलस पूरन यानं 12 चेंडूमध्ये 23 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये पूरन यानं एक षटकार आणि तीन चौकाराचा समावेश होता. तर मार्कस स्टॉयनिस यानं एका चौकाराच्या मदतीने आठ धावांची खेळी केली.
केएल राहुलपुढे चेन्नईचे गोलंदाज अपयशी ठरले. चेन्नईकडून रहमा आणि पथिराणा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. पण इतर गोलंदाजांना विकेट पटकावण्यात अपयश आले. मोईन अली, जाडेजा, तुषार देशपांडे आणि राहुल चाहर यांना विकेट घेण्यात अपय़श आले.