IPL 2023 : कर्णधार राहुल जायबंदी, गुजरातकडून दारुण पराभव, आता स्टार गोलंदाज मायदेशी रवाना
IPL 2023, LSG, Mark Wood : लखनौ सुपर जायंट्सच्या अडचणी कमी व्हायच्या नाव घेईनात.
![IPL 2023 : कर्णधार राहुल जायबंदी, गुजरातकडून दारुण पराभव, आता स्टार गोलंदाज मायदेशी रवाना lsg suffer huge blow mark wood returns home for birth of his daughter 2023 Ipl live marathi News IPL 2023 : कर्णधार राहुल जायबंदी, गुजरातकडून दारुण पराभव, आता स्टार गोलंदाज मायदेशी रवाना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/04/c9c6a14d04710f5035bd61b3df389d101683213501833206_0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL 2023, LSG, Mark Wood : लखनौ सुपर जायंट्सच्या अडचणी कमी व्हायच्या नाव घेईनात. कर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडलाय. त्यातच गुजरातने दारुण पराभव केल्यामुळे प्लेऑफमधील आव्हान खडतर झाले. राहुलशिवाय जयदेव उनादकट हा वेगवान गोलंदाजही दुखापतग्रस्त झालाय. उनादकट याने आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्यातच आता लखनौसाठी आणखी एक धक्कादायक बाब घडली आहे. लखनौचा आघाडीचा वेगवान गोलंदाज मार्क वूड (Mark Wood) मायदेशी रवाना झालाय. पर्सनल कामामुळे मार्क वूड (Mark Wood) मायदेशात रवाना झालाय. लखनौ संघाने याचा व्हिडीओ पोस्ट करत माहिती दिली आहे.
मार्क वूड आयपीएल सोडून गेला -
लखनौ सुपर जायंट्सने मार्क वूड याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. त्यामध्ये मार्क वूड आयपीएल सोडून जाण्याचे कारण सांगत आहे. मार्क वूड बाबा होणार आहे. पत्नी साहा गर्भवती आहे.. पत्नीला वेळ देण्यासाठी मार्क वूड याने आयपीएलमधून माघार घेतली आहे. वूड म्हणाला की, बाळाच्या जन्मामुळे मी घरी परत जात आहे. संघाचे साथ अर्ध्यात सोडत असल्यामुळे मला दुख होत आहे. पण घरी जाणे तितकेच गरजेचे आहे. लवकरच संघासोबत जोडला जाईल.. मी फक्त चार सामन्यातच योगदान देऊ शकलो.. लवकरच संघात परतेन..
संघाचे मनोबल वाढवले -
मार्क वूड याने मायदेशी रवाना होण्यापूर्वी लखनौ संघाचे मनोबल वाढवले... तो म्हणाला की, सर्व खेळाडू चांगली मेहनत घेत आहेत. सपोर्टिंग स्टाफ जबरदस्त आहे. सर्व खेळाडू आपल्या आपल्या क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत. आपल्याला आणखी एका विजयाची गरज आहे.. प्लेऑफमध्ये पोहचल्यानंतर फायनलमध्येही पोहचू... संपूर्ण संघ फक्त विजयासाठी लढत आहे. नक्कीच आपली मेहनत कामाला येईल.
We're so happy for you, Woody. You'll be missed! 🥹💙 pic.twitter.com/4KKd2BVmtX
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 7, 2023
मार्क वूडची कामगिरी कशी राहिली ?
मार्क वूड याने सुरुवातीला दमदार कामगिरी केली. मार्क वूडच्या भेदक माऱ्यासमोर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांनी गुडघे टेकले होते. मार्क वूड याने पाच सामन्यात 11 विकेट घेतल्या आहेत. पण त्यानंतर तो आजारी पडला होता, त्यामुळे प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळाले नाही. मार्क वूड याने पहिल्याच सामन्यात पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. चांगल्या लयीत असणारा मार्क वूड आजारपणामुळे संघात खेळू शकला नाही,.. त्याचा फटकाही लखनौला बसल्याचे दिसतेय. लखनौने आतापर्यंत 11 सामने खेलले आहेत, यापैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. लखनौचा संघ 11 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)