एक्स्प्लोर

KKR vs SRH, IPL 2022 : रसेलची मसल पॉवर, कोलकात्याचा हैदराबादवर 54 धावांनी विजय

KKR vs SRH, IPL 2022 : आंद्रे रसेलच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर कोलकात्याने हैदराबादचा 54 धावांनी पराभव केला.

KKR vs SRH, IPL 2022 : आंद्रे रसेलच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर कोलकात्याने हैदराबादचा 54 धावांनी पराभव केला. कोलकात्याने दिलेल्या 178 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ 20 षटकांत आठ बाद 123 धावांपर्यंत मजल मारु शकला. कोलकात्याच्या विजयाचा हिरो आंद्रे रसेल राहिला. रसेलने फलंदाजी करताना 28 चेंडूत 49 तर गोलंदाजी तीन विकेट घेत कोलकात्याला विजय मिळवून दिला. कोलकात्याचा 13 सामन्यातील हा सहावा विजय होता. यासह कोलकाता गुणतालिकेत 12 गुणांसह सहाव्या क्रमांकावर पोहचलाय. या विजयासह कोलकात्याने प्लेऑफचे आव्हान जिवंत ठेवलेय. हैदराबादचा 12 सामन्यातील सातवा पराभव होता. हैदराबादचा संघ 10 गुणांसह गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. 

कोलकात्याने दिलेलेल्या 178 धावांचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. कर्णधार केन विल्यमसन अवघ्या 9 धावा काढून तंबूत परतला. रसेलने त्याचा अडथळा दूर केला. त्यानंतर साऊदीने लगेच राहुल त्रिपाठी बाद करत हैदराबादच्या अडचणी वाढवल्या. त्रिपाठीही 9 धावा काढून बाद झाला. एका बाजूला विकेट पडत असताना युवा अभिषेक शर्माने विस्फोटक फलंदाजी केली. अभिषेक शर्मा आणि एडन मार्करम यांनी हैदराबादचा डाव सावरला. पण वरुण चक्रवर्तीने अभिषेक शर्माला बाद करत जोडी फोडली. अभिषेक शर्माने 28 चेंडूत 43 धावा केल्या. त्यानंतर निकोलस पूरन दोन धावांवर बाद झाला.. एडन मार्कमचा अडथळा उमेश यादवने दूर करत सामन्यावर वर्चस्व निर्माण केले. त्यानंतर वॉशिंगटन सुंदर 1, शशांक सिंह 11, मार्को जेनसेन 1 धावांवर बाद झाले.. भुवनेश्वर कुमार 6 आणि उमरान मलिक 3 धावांवर नाबाद राहिले. 

कोलकात्याकडून आंद्रे रसेलने भेदक मारा केला. रसेलने चार षटकांत 22 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या रसेलने केन विल्यमसन, वॉशिंगट सुंदर आणि मार्के जेनसेन यांना तंबूत धाडले.. टीम साऊदीनेही अचूक टप्यावर गोलंदाजी केली. साऊदीने दोन विकेट घेतल्या. तर उमेश यादव, सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. 

दरम्यान, 

आंद्रे रसेल (49) आणि सॅम बिलिंग्स (34) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकात्याने निर्धारित 20 षटकांत सात सहा गड्यांच्या मोबदल्यात 177 धावांपर्यंत मजल मारली. उमरान मलिकच्या भेदक माऱ्यापुढे कोलकात्याची फलंदाजी ढासळली होती. पण आंद्रे रसेल आणि बिलिंग्स यांनी वादळी खेळी करत कोलकात्याला सन्माजनक धावसंख्यापर्यंत पोहचवलं.  

बिलिंग्स-रसेलने डाव सांभाळला -
कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हैदराबादच्या गोलंदाजांनी श्रेयसचा निर्णयावर पाणी फेरले. हैदराबादच्या गोलंदाजांनी दुसऱ्याच षटकात  वेंकटेश अय्यरचा अडथळा दूर केला. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि नीतीश राणा यांनी कोलकात्याचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र मोठी खेळी करण्यात अपयश आले. अजिंक्य रहाणे 28 तर नीतीश राणा 26 धावा काढून बाद झाले. कर्णधार श्रेयस अय्यर 15 धावा काढून बाद झाला... रिंकू सिंह 5 धावा काढून बाद झाला.. पाच विकेट झटपट पडल्यानंतर सॅम बिलिंग्स आणि आंद्रे रसेल यांनी कोलकात्याचा डाव सावरला. दोघांनी आधी संयमी फलंदाजी केली, त्यानंतर हैदराबादची गोलंदाजी फोडून काढली. पण मोक्याच्या क्षणी सॅम बिलिंग्सला भुवनेश्वर कुमारने बाद केले. सॅम बिलिंग्सने 34 धावांची खेळी केली. आंद्रे रसेल आणि शॅम बिलिंग्स यांनी  44 चेंडूत 63 धावांची भागिदारी केली. कोलकात्याकडून ही सर्वात मोठी भागिदारी होय. कोलकात्याकडून दुसरी सर्वात मोठी भागिदारी अजिंक्य रहाणे आणि अजिंक्य रहाणे यांनी केली आहे. सॅम बिलिंग्स बाद झाल्यानंतर आंद्रे रसेल याने सामन्याची सर्व सुत्रे आपल्याकडे घेतली. रसेलने अखेरच्या षटकांत धावांचा पाऊस पाडला. रसेलने सुंदरच्या अखेरच्या षटकात तीन षटकार मारत कोलकात्याची धावसंख्या 170 च्या पार नेली. आंद्रे रसेलने 28 चेंडूत 49 धावांची खेळी केली. या खेळीत रसेलने चार षटकार आणि तीन चौकार लगावलेत. 

हैदराबादचा भेदक मारा -
कोलकात्याकडून उमरान मलिक याने भेदक मारा केला. सुरुवातीलाच कोलकात्याला तीन धक्के दिले. उमरान मलिकने चार षटकात 33 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमार, मार्को जेनसन आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget