कोलकात्याचं हैदराबादसमोर 209 धावांचं आव्हान, रसेलची 25 चेंडूत 64 धावांची खेळी
KKR vs SRH, IPL 2024 : आंद्रे रसेल आणि फिलिप सॉल्ट यांच्या अर्धशतकाच्या बळावर कोलकात्यानं 20 षटकात सात विकेटच्या मोबदल्यात 208 धावांपर्यंत मजल मारली.
KKR vs SRH, IPL 2024 : आंद्रे रसेल आणि फिलिप सॉल्ट यांच्या अर्धशतकाच्या बळावर कोलकात्यानं 20 षटकात सात विकेटच्या मोबदल्यात 208 धावांपर्यंत मजल मारली. आंद्रे रसेल यानं 25 चेंडूत 64 धावांचा पाऊस पाडला. फिलिप सॉल्ट यानं 54 धावांची खेळी केली. तर रमणदीप सिंह यानं 17 चेंडूत 35 धावा काढल्या. तर रिंकूने 15 चेंडूत 23 धावांची खेळी केली. हैदराबादकडून नटराजन यानं तीन विकेट घेतल्या. हैदराबादला विजयासाठी 209 धावांचे आव्हान मिळाले आहे. आंद्रे रसेल यानं शेवटच्या पाच षटकात हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई केली.
कोलकात्याची सुरुवात खराब -
हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकात्याची सुरुवात अतिशय खराब झाली. हैदराबादच्या माऱ्यापुढे आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली, एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या. सलामीला आलेला सुनील नारायण फक्त दोन धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर वेंकटेश अय्यरही सात धावांवर बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यर याला खातेही उघडता आले नाही. सुनील नारायण धावबाद झाला. त्यानंतर नटराजन यानं एकाच षटकात दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. नटराजन यानं आधी वेंकटेश अय्यर आमि नंतर श्रेयस अय्यर यांना लागोपाठ तंबूचा रस्ता दाखवला. हे कमी होतं की काय म्हणून नीतीश राणा स्वस्तात तंबूत परतला. नीतीश राणा याला फक्त 9 धावा करता आल्या. नितीश राणा यानं एका चौकाराच्या मदतीने 9 धावा केल्या.
फिलिप साल्टची झुंज -
एकीकडे लागोपाठ विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला फिलिप सॉल्ट यानं आक्रमक फंलदाजी करत धावसंख्या वाढवली. सॉल्ट यानं 40 चेंडूत 54 धावांची खेळी केली. सॉल्ट यानं रमणदीप सिंह याच्या साथीने कोलकात्याची धावसंख्या वाढवली. सॉल्ट यानं तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने अर्धशतक ठोकलं. तर रमणदीप सिंह यानं 14 चेंडूमध्ये चार षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 35 धावांचा पाऊस पाडला. सॉल्ट आणि रमणदीप यांनी 29 चेंडूमध्ये 54 धावांची भागिदारी केली. फिलिप सॉल्ट यानं कोलकात्यासाठी पायाभऱणी केली. त्याच्यावर रिंकू सिंह आणि आंद्रे रसेल यांनी फिनिशिंग टच दिला.
रसेल मसल -
कोलकात्याचा संघ अडचणीत असताना आंद्रे रसेल यानं विस्फोटक फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं. रसेल खेळायला आलेला तेव्हा कोलकाता 6 बाद 119 अशा स्थितीत होता. पण आंद्रे रसेल यानं रिंकूच्या साथीनं हैदराबादची गोलंदाजी फोडली. आंद्रे रसेल यानं फक्त 25 चेंडूमध्ये 64 धावांचा पाऊस पाडला. आंदरे रसेल यानं हैदराबादच्या गोलंदाजांची चौफेर पिटाई केली. रसेल यानं सात षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 64 धावांची खेळी केली.आंद्रे रसेल आणि रिंकू सिंह यांनी फक्त 33 चेंडूमध्ये 81 धावांची भागिदारी केली. आंद्रे रसेल यानं चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. रिंकू सिंह यानं 15 चेंडूमध्ये तीन चौकारांच्या मदतीने 23 धावांची खेळी केली.
हैदराबादची गोलंदाजी कशी ?
हैदराबादच्या गोलंदाजांनी सुरुवातीला कोलकात्याच्या फलंदाजांना रोखलं. एकापाठोपाठ एक विकेट घेतल्या. पण हैदराबादच्या माऱ्याकडे रसेलचं उत्तरचं नव्हतं. रसेलने सर्वांची कुटाई केली. हैदराबादकडून नटराजन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. नटराजन यानं 4 षकात 32 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. मयांक मार्कंडे यानं 2 विकेट घेतल्या. कर्णधार पॅट कमिन्स याला एक विकेट मिळाली. भुवनेश्वर कुमार आणि मार्को यान्सन महागडे ठरले. भुवनेश्वर कुमार याला 51 धावा काढल्या. तर मार्को यान्सन याला 3 षटकात 40 धावा मारल्या.