RR Vs KKR, IPL 2022: आईनं लग्नासाठी मुलगा शोधायला लावला, त्यानंतर तरूणीनं थेट क्रिकेटपटूलाच घातली लग्नाची मागणी!
KKR vs RR: मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल 2022 चा 30 वा सामना खेळला जात आहे.
KKR vs RR: मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल 2022 चा 30 वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकाताच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राजस्थान आणि कोलकाताचा सामना पाहण्यासाठी आलेल्या एका तरुणीनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. आईनं लग्नासाठी मुलगा शोधायला लावला म्हणून या तरूणीनं थेट कोलकाताच्या एका स्टायलिश क्रिकेटपटूला लग्नाची मागणी घातली आहे.
कोलकाता नाईट रायडर्सनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एका तरूणीचा फोटो शेअर केला आहे. ज्यात तिच्या हातात एक पोस्टर दिसत आहे. या पोस्टरच्या माध्यमातून कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यरला लग्नाची मागणी घातली आहे. "माझ्या आईनं मला लग्नासाठी मुलगा शोधायला सांगितलंय. तर, माझ्याशी लग्न करशील का श्रेयस अय्यर?"
ट्वीट-
हेड टू हेड रेकॉर्ड
आयपीएलमधील आजवरच्या इतिहासाचा विचार करता राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ तब्बल 25 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता कोलकात्याचं पारडं काहीसं जड असून त्यांनी 13 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे राजस्थानला 11 सामने जिंकण्यात यश आलं आहे. तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे.
राजस्थान रॉयल्सचा संघ-
जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, करुण नायर, संजू सॅमसन (कर्णधार,विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, प्रसिध कृष्णा, रवीचंद्रन अश्विन, ओबेद मकॉय, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल.
कोलकाता नाईट रायडर्स-
अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), शेल्डॉन जॅक्सन (विकेटकीपर), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नारायण, पॅट कमिन्स, उमेश यादव, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.
हे देखील वाचा-
- IPL 2022: 'या' खेळाडूंचं भविष्य धोक्यात? आयपीएलचा पंधरावा हंगाम शेवटचा ठरण्याची शक्यता, यादीत अनेक भारतीय
- Watch Video: पंजाब-हैदराबाद सामन्यादरम्यान लियान लिव्हिंगस्टोन थेट पंचाशीच भिडला! नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ
- GT Vs CSK: राशीद खान- डेव्हिड मिलरची वादळी खेळी, चेन्नईच्या तोंडातून विजयी घास हिसकावला, गुजरातचा 3 विकेट्सनं विजय