भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
Maharashtra Assembly Election Result 2024: माहीममध्ये सदा सरवणकरांना गुलिगत धोका? भाजप पदाधिकाऱ्याचा ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश.
Mahim Vidhan Sabha Constituncy 2024 : राज्याच्या (Maharashtra Assembly Election Result 2024) सत्तेची चावी कुणाच्या हाती पडणार? याचं चित्र अवघ्या काही तासांतच स्पष्ट होणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या हायव्होल्टेज लढतींपैकी एक लढत म्हणजे, माहीम विधानसभा मतदारसंघाची (Mahim Assembly Constituency) लढाई. माहीममध्ये (Mahim) तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये शिंदेंची शिवसेना (Shiv Sena Shinde Group), ठाकरे गट (Thackrey Group) आणि मनसे (MNS) अशा तीन पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. महीममध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackrey) निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अशातच आता निवडणूक निकाल जाहीर होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. तत्पूर्वी माहीममध्ये मोठा ट्वीस्ट समोर आला आहे.
निवडणुकीच्या घोषणेआधीपासूनच माहीम विधानसभेची चुरस चर्चेत होती. कधी दुहेरी, कधी तिहेरी असं म्हणत म्हणत माहीममध्ये ठाकरेंचे महेश सावंत (Mahesh Sawant), मनसेचे अमित ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली. आता निकालाला काही तास शिल्लक आहे. अशातच माहीममधले भाजपचे सर्वच्या सर्व पदाधिकारी माझ्यासोबतच आहे, असं म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका तर मिळणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याला कारण आहे, माहीममधल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यानं हातात शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
माहीम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उपाध्यक्ष सचिन शिंदे निवडणूक निकालाच्या एक दिवस अगोदर, म्हणजेच, आज शुक्रवारी दुपारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. सचिन शिंदे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना घेऊन मात्र मातोश्रीवर पोहोचल्याची माहिती मिळत आहे. माहीमचे उमेदवार महेश सावंतही यावेळी उपस्थित असणार आहेत. निकालाच्या आदल्या दिवशी माहीममध्ये भाजपला पडलेल्या खिंडारामुळे महायुतीमध्ये खळबळ माजली आहे.
दरम्यान, माहीममध्ये राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अमित ठाकरेंचं नाव जाहीर झाल्यापासूनच माघार घेण्यासाठी सदा सरवणकरांना गळ घालण्यात आली. त्यानंतर उद्धव ठाकरे पुतण्याविरोधात माघार घेणार, असंही बोललं जात होतं. पण, अखेर कोणीच माघार घेतली नाही. माहीमच्या रिंगणात तिरंगी लढत पाहायला मिळाली.