IPL 2022: 'या' खेळाडूंचं भविष्य धोक्यात? आयपीएलचा पंधरावा हंगाम शेवटचा ठरण्याची शक्यता, यादीत अनेक भारतीय
IPL 2022: यावेळी आयपीएलमध्ये खेळणाऱ्या काही खेळाडूंना चांगलं प्रदर्शन करून भारतीय संघात स्थान मिळवण्याची संधी होती.
![IPL 2022: 'या' खेळाडूंचं भविष्य धोक्यात? आयपीएलचा पंधरावा हंगाम शेवटचा ठरण्याची शक्यता, यादीत अनेक भारतीय ipl 2022 ajinkya rahane vijay shankar chris jordan manish pandey poor performance in indian premiere league might not be selected in national teams IPL 2022: 'या' खेळाडूंचं भविष्य धोक्यात? आयपीएलचा पंधरावा हंगाम शेवटचा ठरण्याची शक्यता, यादीत अनेक भारतीय](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/3/2017/02/05213832/England_Jordan.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL 2022: आयपीएलमध्ये चांगलं प्रदर्शन करून अनेक खेळाडूंनी आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. तसेच खराब फॉर्ममुळं बाहेर पडलेल्या खेळाडूंना आयपीएलमुळं पुन्हा आपल्या राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. यावेळी आयपीएलमध्ये खेळणाऱ्या काही खेळाडूंना चांगलं प्रदर्शन करून भारतीय संघात स्थान मिळवण्याची संधी होती. परंतु, खराब फॉर्ममुळं त्याचं राष्ट्रीय संघात खेळण्याचं स्वप्न धुसर होताना दिसत आहे. एवढेच नव्हेतर, आयपीएलच्या पुढील हंगामात त्यांना संघात स्थान मिळवणं देखील कठीण झालं आहे. हे खेळाडू कोण आहेत? जाणून घेऊयात.
विजय शंकर
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये गुजरात टायटन्सच्या संघान भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरवर बोली लावली. मात्र, त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानं आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. त्यानं चार सामन्यात एकूण 19 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याचा स्ट्राईक रेट 54.2 आहे. यामुळं आयपीएलच्या पुढच्या हंगामात विजय शंकरचं गुजरातच्या संघाकडून खेळणं कठीण मानलं जात आहे.
अजिंक्य रहाणे
भारताचा फलंदाज अजिंक्य राहणे सध्या कठीण काळातून जाताना दिसत आहे. रहाणेला पहिल्याच कसोटी सामन्यातून वगळण्यात आलं आहे. यातच भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अजिंक्य रहाणे आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून पुन्हा भारतीय संघात पुनरागमन करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यानं ही संधीदेखील गमावली आहे, असं बोलणं वावग ठरणार नाही. त्यानं कोलकात्याकडून पाच सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं केवळ 80 धावा केल्या आहेत.
मनीष पांडे
या हंगामात लखनौसाठी चांगली कामगिरी करून मनिष पांडेला भारतीय संघात स्थान मिळवण्याची मोठी संधी होती. मात्र त्याला आतापर्यंत काही विशेष कामगिरी करता आलेली नाही. त्यानं आतापर्यंत आयपीएलमधील 4 सामन्यात केवळ 60 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत त्याचं भारतीय संघात पुनरागमन करणं कठीण असल्याचं बोललं जात आहे.
ख्रिस जॉर्डन
चेन्नईकडून खेळणारा ख्रिस जॉर्डन डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. पण गुजरातविरुद्धच्या सामन्यानं त्यानं निराशाजनक कामगिरी केली. ज्यामुळं पुढच्या वर्षीच्या आयपीएलमध्ये कोणताही संघ त्याच्यावर बोली लावण्याची शक्यता फार कमी आहे.
हे देखील वाचा-
- Umran Malik: "उमरान मलिकच्या गोलंदाजीचा सामना करणं म्हणजे..." त्याच्याच संघातील खेळाडू काय म्हणतोय? एकदा बघाच!
- RR vs KKR: राजस्थान- कोलकाता सामन्यात विक्रमांचा पाऊस पडणार; संजू सॅमसन, सुनील नारायण 'हे' खेळाडू रचणार इतिहास
- GT Vs CSK: राशीद खान- डेव्हिड मिलरची वादळी खेळी, चेन्नईच्या तोंडातून विजयी घास हिसकावला, गुजरातचा 3 विकेट्सनं विजय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)