RR vs RCB: शेन वॉर्नला आम्ही सर्वजण मिस करतोय, पाहा सामन्यानंतर काय म्हणाला बटलर?
राजस्थान रॉयलने आरसीबीचा (RCB) पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. सामन्यानंतर शतकी खेळी करणाऱ्या जोस बटलरने (jos buttler) प्रतिक्रिया दिली आहे.
RR vs RCB : जोस बटलरच्या (jos buttler) शतकी खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) फायनलमध्ये धडक मारली आहे. काल झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयलने आरसीबीचा (RCB) पराभव केला. 2008 नंतर राजस्थानने आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. आता 29 मे रोजी राजस्थानचा सामना हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सविरोधात होणार आहे. दरम्यान, या सामन्यानंतर जोस बटलरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्याने राजस्थान रॉयलचा पहिला कर्णदार शेन वॉनची आठवण काढली आहे. राजस्थान रॉयल्सचा पहिला कर्णधार शेन वॉर्न आमच्या संघासाठी खूप महत्त्वाचा होता. आम्ही सर्वजण त्याला मिस करत असल्याचे बटलरने म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाला बटलर
मी या मोसमात फार कमी अपेक्षा घेऊन आलो होतो. पण ऊर्जेची कमतरता नव्हती. आता अंतिम सामना खेळणे हा एक चांगला अनुभव असेल. या हंगामाच्या मध्यंतरी थोडा दबाव जाणवत होता. कधीकधी परिस्थिती अनुकूल नसते. अशा परिस्थितीत मी चुकीचा फटका मारुन आऊट होतो असेही बटलर म्हणाला. दरम्यान, कुमार संगकाराने मला सांगितले की, तुम्ही जितका जास्त वेळ विकेटवर घालवाल, तितकी चांगली कामगिरी कराल. आयपीएल ही टी-20 क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा असल्याचेही तो म्हणाला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. राजस्थान रॉयल्सचा (आरआर) पहिला कर्णधार शेन वॉर्न या संघासाठी खूप महत्त्वाचा होता. आम्ही सर्वजण त्याला मिस करत असल्याचे यावेळी बटलरने सांगितले.
जोस बटलरला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले
तब्बल 14 वर्षांनंतर राजस्थान रॉयल्स (RR) संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्याचवेळी या पराभवासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे (आरसीबी) विजेतेपदाचे स्वप्नही भंगले आहे. राजस्थानच्या या विजयाचा हिरो ठरला तो जोस बटलर. बटलरने षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. बटलरने 60 चेंडूत नाबाद 106 धावांची धडाकेबाज खेळी केली. यादरम्यान त्याने 10 चौकार आणि 6 षटकार मारले. या मोसमातील बटलरचे हे चौथे शतक आहे. यासह तो एका मोसमात सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीसोबत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
महत्वाच्या बातम्या: