एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Top 10 Key Points : बटलरने आरसीबीचा पत्ता केला कट, आज झालेल्या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवूयात...

IPL 2022, RR vs RCB: जोस बटलरची शतकी (106) खेळी आणि प्रसिद्ध कृष्णा-अबोद मकॉय यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सात गड्यांनी विजय मिळवलाय.

IPL 2022, RR vs RCB: जोस बटलरची शतकी (106) खेळी आणि प्रसिद्ध कृष्णा-अबोद मकॉय यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सात गड्यांनी विजय मिळवलाय. या पराभवासह आरसीबीचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलेय. राजस्थान रॉयल्सने 2008 नंतर आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली. आता 29 मे रोजी राजस्थानचा सामना हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सविरोधात होणार आहे. आज झालेल्या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवूयात... 

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. 

आरसीबीची केजीएफ म्हणजे कोहली, ग्लेन आणि फाफ ही तिकडी पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली.. विराट कोहली 8 चेंडूत सात धावा, फाफ डु प्लेसिस 27 चेंडूत 25 धावा तर ग्लेन मॅक्सवेल 13 चेंडूत 24 धावा काढून बाद झाला..

रजत पाटीदार याने एका बाजूने आरसीबीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पाटीदारने 42 चेंडूत 58 धावांची खेळी केली. आरसीबीचा संघ 157 धावांपर्यंत मजल मारु शकला. आरसीबीला अखेरच्या पाच षटकात फक्त 34 धावा काढता आल्या.. 

महिपाल लोमरोरला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. तो 8 धावा काढून बाद झाला... फिनिशर कार्तिकलाही मोठी खेळी करता आली नाही... कार्तिक फक्त सहा धावा काढून बाद झाला.. त्यानंतर हसरंगा एकही धाव न काढता बाद झाला... 

युजवेंद्र चहलला आरसीबीविरोधात एकही विकेट मिळाली नाही. सलग दोन सामन्यात चहलची विकेटची पाटी कोरी राहिली आहे. क्वालिफायर सामन्यातही गुजरातनेही चहलला विकेट दिली नव्हती. क्वालिफायरच्या दुसऱ्या सामन्यात आरसीबीच्या फंलदाजांनी चहलच्या गोलंदाजीवर सावध खेळी केली. चहललने चार षटकात तब्बल 45 धावा मोजल्या... विकेट मिळवण्यात चहल अपयशी ठरला. आरसीबीने चहलच्या गोलंदाजीवर तीन षटकार आणि एक चौकार वसूल केला. 

वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीपुढे आरसीबीची दाणादाण उडाली.. प्रसिद्ध कृष्णाने पावरप्लेमध्ये विराट कोहलीला बाद करत आरसीबीच्या अडचणी वाढवल्या.. तर हाणामारीच्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने कार्तिक आणि हसरंगाला बाद करत धावांना आवर घातली.  प्रसिद्ध कृष्णाने चार षटकात 22 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या... 

ओबेद मकॉयने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत आरसीबीच्या फंलदाजांना अडचणीत टाकले..मकॉयने चार षटकात 23 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. मकॉयने आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस, महिपाल लोमरोर आणि हर्षल पटेल यांना तंबूचा रस्ता दाखवला. बोल्ट आणि अश्विनला प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. 

158 धावांचा पाठलाग करताना राजस्थानच्या सलामी फलंदाजांनी विस्फोटक सुरुवात केली. यशस्वी जायस्वाल आणि जोस बटलर यांनी वादळी सुरुवात केली. दोघांनी 5 षटकात 61 धावांची सलामी दिली. यशस्वी जायस्वालने 13 चेंडूत 21 धावांची खेळी केली. त्यानंतर संजू सॅमसनने 21 चेंडूत 23 धावांची छोटेखानी खेळी केली. पडिक्कलला मोठी खेळी करण्यात अपयश आले. जोस बटलरने एका बाजूला पाय रोवत फलंदाजी केली. बटलरने आरसीबीच्या सर्व गोलंदाजांची धुलाई केली. बटलरने राजस्थान रॉयल्सला फायनलमध्ये पोहचवलं. 

बटलरचं चौथं शतक - 
जोस बटलरने यंदाच्या हंगामातील चौथं शतक झळकावलेय. बटलरने 59 चेंडूत शतकी खेळी केली. विराट कोहलीच्या एकाच हंगामात चार शतकं झळकावण्याचा विक्रमाची बटलरने बरोबरी केली आहे. जोस बटलर यंदाच्या हंगामात 800 धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरलाय.  

वानंदु हसरंगा आणि जोश हेजलवूडचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही. सर्वच गोलंदाज अपयशी ठरले... सिरज सर्वात महागडा गोलंदाज ठरला.. त्याशिवाय आरसीबीच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षणातही बऱ्याच चुका केल्या. बटलरला आरसीबीने जिवनदान दिले.. त्याचा फटका त्यांना बसला.. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Embed widget