IPL Mega Auction 2025 : BCCIची घोषणा! 204 जागांसाठी 574 खेळाडूंची नावे शॉर्टलिस्ट, 'या' दिवशी भरणार खेळाडूंचा 'बाजार'
आयपीएल ही जगातील सर्वाधिक लोकप्रिय लीग पैकी एक आहे. अनेक स्टार खेळाडूंनी येथे खेळून आपली कारकीर्द घडवली आहे.
IPL Player Auction 2025 : आयपीएल ही जगातील सर्वाधिक लोकप्रिय लीग पैकी एक आहे. अनेक स्टार खेळाडूंनी येथे खेळून आपली कारकीर्द घडवली आहे. आयपीएलमध्ये खेळून खेळाडूंना पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मिळते. आयपीएल 2025 साठी मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे होणार आहे. यासाठी सर्व फ्रँचायझींनी तयारी पूर्ण केली आहे. आता IPL गव्हर्निंग कौन्सिलने 574 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे जे लिलावात दिसणार आहेत.
आयपीएल 2025 साठी होणाऱ्या मेगा लिलावासाठी 1574 खेळाडूंनी नोंदणी केली होती, त्यापैकी 998 खेळाडूंची नावे स्क्रीनिंगनंतरच लिलावाच्या शर्यतीतून वगळण्यात आली आहेत. लिलावात सहभागी होणाऱ्या 576 खेळाडूंमध्ये 48 कॅप्ड आणि 318 अनकॅप्ड भारतीय, 193 कॅप्ड परदेशी आणि 12 अनकॅप्ड परदेशी आणि 3 असोसिएट नेशन खेळाडूंचा समावेश आहे.
या मेगा लिलावात 81 खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. तर 27 खेळाडूंची किंमत 1.50 कोटी रुपये आहे. त्याच वेळी या यादीत 18 खेळाडू आहेत, ज्यांची मूळ किंमत 1.25 कोटी रुपये आहे.
🚨 NEWS 🚨
— IndianPremierLeague (@IPL) November 15, 2024
TATA IPL 2025 Player Auction List Announced!
All the Details 🔽 #TATAIPLhttps://t.co/QcyvCnE0JM
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ज्यामध्ये लिहिले की, एकूण 574 खेळाडूंनी आयपीएल मेगा लिलाव 2025 साठी आपली नावे नोंदवली आहेत. सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात 24 नोव्हेंबर आणि 25 नोव्हेंबर रोजी हा मेगा लिलाव आयोजित केला जाणार आहे. या मेगा लिलावात केएल राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल सारखे मोठे भारतीय खेळाडू असतील. याशिवाय जोस बटलर, डेव्हिड वॉर्नर, टिम डेव्हिड, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी आणि मिचेल स्टार्क यांसारख्या मोठ्या परदेशी नावांचा समावेश आहे.
लिलाव किती वाजता सुरू होईल?
जेद्दाहमधील लिलाव 24 नोव्हेंबर रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता (भारतीय वेळेनुसार 3:30 वाजता) सुरू होईल. भारत आणि जेद्दाहच्या वेळेत अडीच तासांचा फरक आहे.
हे ही वाचा -