Sa vs Ind 4th T20 : भारताने नाणेफेक जिंकली, कर्णधार सूर्याने फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, जाणून घ्या प्लेइंग-11
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 4 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना जोहान्सबर्ग येथे खेळवला जात आहे.
South Africa vs India, 4th T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 4 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना जोहान्सबर्ग येथे खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीच्या वेळी सूर्यकुमार यादव म्हणाला की, आम्ही गेल्या तीन सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली आहे, त्यामुळे या सामन्यातही आम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
🚨 Toss Update 🚨
— BCCI (@BCCI) November 15, 2024
Captain @surya_14kumar wins the toss and #TeamIndia elect to bat in the final T20I 👌👌
Live - https://t.co/b22K7t9imj#SAvIND pic.twitter.com/8WWKoVMRpZ
दोन्ही संघ जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर भिडतील. हे मैदान भारतासाठी नेहमीच खास राहिले आहे. 2007 मध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला हरवून पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. वर्षभरापूर्वी शेवटच्या टी-20 मालिकेत कर्णधार सूर्यकुमार यादवने शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला होता. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारताने 16 पैकी 13 सामने जिंकले असून यावेळी तो मालिका जिंकून पुनरागमन करू इच्छितो. शेवटची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली होती तर एक सामना पावसामुळे वाया गेला होता. टी-20 क्रिकेटमधील सर्वात आक्रमक फलंदाजांपैकी एक असलेल्या रिंकू सिंगचा फॉर्मही चिंतेचा विषय आहे, जो गेल्या काही महिन्यांपासून चांगला खेळ करू शकलेला नाही. सहा किंवा सातव्या क्रमांकावर असल्याने तो आरामात खेळू शकत नसल्याचे दिसते.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
दक्षिण आफ्रिका : रायन रेक्लेस्टोन, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (सी), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्के जेनसेन, जेराल्ड कोएत्झी, अँडिले सिमेलेन, केशव महाराज, लुथो सिपामला.
4th T20I. South Africa XI: R. Hendricks, R. Rickelton, A. Markram (c), T. Stubbs, H. Klaasen (wk), D. Miller, M. Jansen, A. Simelane, G. Coetzee, K. Maharaj, L. Sipamla. https://t.co/jQPvZ1OhZJ #SAvIND
— BCCI (@BCCI) November 15, 2024
भारत : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती.
4th T20I.India XI: S. Samson (wk), A. Sharma, S. Yadav (c), T. Varma, H. Pandya, R. Singh, A. Patel, A. Singh, R. Bishnoi, R.Singh, V. Chakravarthy.https://t.co/jQPvZ1OhZJ #SAvIND
— BCCI (@BCCI) November 15, 2024
हे ही वाचा -